Breaking News

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत

बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी

नागपूर, दि. २१ – आगामी विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहु नये या करीता भारत निवडणूक आयोगाकडून मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने नवीन मतदारांची नोंदणी करुन मोठ्या प्रमाणात नमुना क्र. 6 गोळा करण्याचे निश्चित करण्यात आलेले आहे. तसेच नागपूर जिल्हयात 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार यादीच्या संक्षिप्त पुनरिक्षणाच्या कार्यक्रमा अंतर्गत 27 मार्च रोजी प्रसिध्द मतदार यादीत ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आढळून आलेले नाही अशा मतदारांची नोंदणी करुन घेण्यात येणार आहे.

सदर संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी करणार असून जे मतदार 18 वर्षाचे झालेले आहे अशा पात्र मतदारांचे नमुना क्र.6 भरुन घेतील. मतदार यादीत मृत मतदार, दुबार मतदार व जे मतदार त्यांचे पत्त्यावर आढळत नाही अशा मतदारांचे नाव मतदार यादीतून कमी करुन मतदार यादीतील त्रुटया दुर करतील.

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण करावयाचे असून या अंतर्गत आवश्यकतेनुसार मतदान केंद्राच्या नावात बदल, ठिकाणात बदल, पत्यात बदल करुन घेता येईल. उपरोक्त सर्व दुरुस्तीसह 25 जुलै रोजी एकत्रीकृत मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल. 25 जुलै ते 9 ऑगस्ट या कालावधीत प्रसिध्द केलेल्या मतदार यादीवर दावे व हरकती सादर करता येईल. याच कालावधीत शनिवार आणि रविवार विशेष शिबिर आयोजित करण्यात येईल. या शिबिराची तारीख मुख्य निवडणूक अधिकारी निश्चित करेल. विशेष शिबिराचे दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपले जवळील मतदान केंद्रावर सर्व साहित्यासह उपस्थित राहून कार्यालयीन वेळेत नमुना क्र. 6. 7 आणि 8 स्वीकारतील व दि. 19 ऑगस्ट पर्यंत आलेल्या सर्व अर्जावर निर्णय घेऊन दावे व हरकती निकाली काढण्यात येऊन 20 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात येईल.

 

नागपूर जिल्हयातील मतदार यादीचे शुध्दीकरणाचे काम आगामी विधानसभा, नागपूर महानगर पालिका निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात येत असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी जिल्हयातील सर्व मतदारांना तसेच सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना आपले नाव मतदार यादीत असल्याबाबत खात्री करण्याचे आवाहन केलेले आहे, ज्या मतदारांचे नाव मतदार यादीत आढळून आलेले नसेल अशा मतदारांनी आपले नाव नियमानुसार आवश्यक कागदपत्रासह नमुना क्र. 6 भरुन विहीत मुदतीत मतदार यादीत समाविष्ट करण्याबाचचा अर्ज Online (https://ceoelection.maharashtra.gov.in/ceo/ किंवा Voter Helpline App) Offline (मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी, मतदार मदत केंद्र, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी इ.) येथे सादर करण्याचे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रवीण महिरे यांनी केले आहे.

******

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचे सर्व प्रस्ताव 1 जुलै पर्यंत स्विकारले जाणार

नागपूर, दि.20 : जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत येत्या 1 जुलैपर्यंत सर्व …

नागपूर जिल्ह्यासाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट

नागपूर, दि. 8 : भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी वादळीवारा, वीज, गारपीट व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved