jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
▪️यवतमाळ जिल्हातील समाजकल्याणच्या १८ वस्तीगृह व ७ निवासीशाळांमध्ये होत आहे नित्कृष्ट दर्जाचा भोजन पुरवठा
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
राळेगाव :- आदीवासी बहुल आणि शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळख असलेल्या जिल्हात बहुतांश गरीब, गरजु विद्यार्थी व विद्यार्थीनी समाजकल्याणच्या वस्तीगृहामध्ये व निवासी शाळांमध्ये राहतात. आणी आम्ही केलेल्या पाहणी दरम्यान असे निदर्शनास आले की, या यवतमाळ जिल्हातील समाजकल्याणच्या १८ वस्तीगृह व ७निवासीशाळांमध्ये होणा-या नित्कृष्ट दर्जाचे जेवण विद्यार्थ्यांना पुरविण्यात येते.
समाजकल्याण विभागाच्या उमरखेड येथील मुलींच्या वस्तीगृहाला नित्कृष्ट भोजन पुरवठा होत असल्याचा गंभीर प्रकार नुकताच उघडकीस आला. हे प्रकरण थेट सामाजिक न्यायमंत्री यांच्या पर्यंत पोहोचल्याने ठोस कार्यवाहीची अपेक्षा होती. मात्र एजंसीवर दंडात्मक कार्यवाही करून व्यवस्थापक बदलविण्यात आला.
त्यामुळे भोजन पुरवठादार एजंसीवर कारवाई कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हातील समाजकल्याणच्या १८ वस्तीगृह व ७ निवासीशाळांमध्ये विद्यार्थाना भोजन पुरवठा करण्यासाठी शासनाने एक ते दीड वर्षापुर्वी कैलासफुड अॅण्ड किराणा जनरल स्टोअर्स या एजंसीला कंत्राट दिला. भोजन पुरवठा दार वार्षीक मुल्यमापनात सदर एजंसीने दोन वस्तीगृहाना असमाधानकारक तर इतर ठिकाणी सर्वसाधारण दर्जाचा भोजन पुरवठा केल्याची बाब अहवालातुन समोर आली होती. याप्रकरणी दंड ही केला होता एजंसीने तालुका स्तरावर नेमलेल्या व्यवस्थापकांपैकी बहुतांश कंत्राटदार आहे या कंत्राटापुर्वी जिल्हातील वस्तीगृहांचे पुरवठादार हेच कंत्राटदार होते. शासनाने दर्जदार भोजन देण्याच्या हेतुने प्रती विद्यार्थी १७९.६६ रुपये या दराने कंत्राट दिली.
मात्र एजंसीने व्यवस्थापकांच्या नावाखाली पोट कंत्राटदार नेमले आहे. सेंट्रल किचन देखील दिसुन येत नसुन तालुका स्तरावरच भोजन पुरवठा सुरू आहे. संपुर्ण जिल्हातील वस्तीगृहांची तपासणी केल्यास गोडबंगाल बाहेर येईलच. तरी आपणास विनंती आहे की, यासर्व प्रकरणाची गंभीर दखल घेवुन सदर एजंसीवर कारवाई करून त्यांचा कंत्राट रद्द करण्यात यावा. जेणेकरून वस्तीगृहा व निवासी शाळांमधील विद्यार्थ्यांना खाण्या योग्य भोजनाचा पुरवठा होईल.
अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना जिल्हा अध्यक्ष अभिजीत नानवटकर यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या माध्यमातून देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे या प्रसंगी मनसेचे जिल्हा अध्यक्ष देवा शिवरामवार , अनिल हमदापुरे , जिल्हा उपाध्यक्ष देविदास शहाणे, उमरखेड तालुका अध्यक्ष सादिक शेख, प्रथमेश पाटील यांच्या सह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी उपस्तीत होते.