Breaking News

यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने भव्य “तिरंगा यात्रा” चे आयोजन

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे

यवतमाळ :- दिनांक 21 मे 2025 ला यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने आज दिनांक 21 मे 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, यवतमाळ येथे दुपारी 12.00 वाजता “ऑपरेशन सिंदूर” या ऐतिहासिक लष्करी मोहिमेला समर्पित भव्य “तिरंगा यात्रा” चे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात यवतमाळ बस स्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादनाने झाली. यावेळी देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतरत्न राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या दूरदृष्टी, विज्ञाननिष्ठा व आधुनिक भारतासाठीच्या योगदानाचा स्मरण करण्यात आला.

यानंतर देशाच्या सीमेवर कार्य करणाऱ्या शूर सैनिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभानंतर देशभक्तीपर घोषणांनी दुमदुमलेल्या वातावरणात शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली.ही तिरंगा यात्रा “ऑपरेशन सिंदूर” मधील भारतीय लष्कराने दाखवलेल्या अद्वितीय शौर्य, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आली होती. भारतीय लष्कर, नौदल व वायूदल यांच्या पराक्रमाला कृतज्ञतेने वंदन करत, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्याचा काँग्रेस पक्षाचा हा उपक्रम होता.

यात्रेत नागरिक, युवक, महिलावर्ग, समाजसेवक, कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला. “आपला सहभाग केवळ उपस्थिती नव्हे, तर भारतीय लष्कराच्या शौर्याला दिलेली आदरांजली आहे,” असे आवाहन यावेळी करण्यात आले.

यावेळी आमदार बाळासाहेब मांगुळकर, माजी मंत्री वसंतराव पुरके, जिल्हाध्यक्ष प्रफुल मानकर, तसेच अशोकराव बोबडे, अरुण राऊत, बबलू देशमुख, संजय ठाकरे, साहेबराव खडसे, अनिल गायकवाड, कृष्णा पुसनाके, शैलेश गुल्हाने, अरविंद वाढोनकर, रमेश भिसणकर, विजय मोघे, जाफर खान, रवी ढोक, राजू चांदेकर, विकी राऊत, छोटू सवयी, नामदेव दोनाडकर, संजय गायधाने, रामराव पवार, राजू पोटे, राजेंद्र तेलंग, अंकुश मुनेश्वर, कुनाल जतकर, किशोर धामंदे, अमय घोडे, मोहन बनकर यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

एका 19 वर्षीय मुलीवर सामूहिक लैंगिक अत्याचार

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   ” चिमूर शहरातील घटना “ ” दोन आरोपीला …

शेवगांव शहरासह तालुक्यातील बनावट दारू विक्रीला पाथर्डीच्या पूर्व भागातील त्या आकाचे पाठबळ ???

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved