jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
” शांतता राखण्याकरीता पोलीसांनी केली आवाहन “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून सोमवारी नागपूर मध्ये हिंसाचार उफाळल्याची घटना घडली त्याच अनुषंगाने चिमूर शहरात आज पोलिसांनी रूट मार्च काढून शांतता राखण्याचे आव्हान केले. सोमवार ला औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून हिंसाचार उफाळल्याची घटना घडली याचे आता राजकीय क्षेत्रात देखील पडसाद उमटत आहेत.
या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी सहा वाजता चिमूर पोलिसांनी शहरातील मुख्य मार्गाने व गजबजलेल्या वस्तीतून रूट मार्च चे आयोजन केले. चिमूर पोलिसांनी रूट मार्चच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी चिमूर पोलिस आहेत असा विश्वास दर्शविला. पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांचे मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक निशांत फुलेकर. पोलिस उपनिरीक्षक घनश्याम नवखरे सह सर्व पोलिस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते