नागपूर,दि. 21 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत होणार असून निवडणूक विभाग-जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागातर्फे योग्य ते खबरदारीचे उपाय योजले आहेत. जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी मतमोजणीच्या केंद्राच्या परिसरात भारतीय न्याय संहिता 163 अन्वये जमाव बंदी आदेश निर्गमित केले आहेत. ज्यांना सुरक्षा पासेस देण्यात आलेले आहेत त्यांनाच प्रवेश दिला जाईल.
23 नोव्हेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील 12 विधानसभा निवडणुकांची मतदारसंघ निहाय मतमोजणी केंद्र पुढील प्रमाणे आहेत.
काटोल विधानसभा निवडणूक मतमोजणी प्रशासकीय इमारत, तळमजला तहसील कार्यालय, काटोल येथे होईल. सावनेर विधानसभा निवडणूक मतमोजणी शासकीय आयटीआय सावनेर येथे होईल. हिंगणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी नागपूर ग्रामीण तहसील कार्यालय येथे होईल.
उमरेड विधानसभा निवडणूक मतमोजणी नुतन आदर्श कला, वाणिज्य आणि श्रीमती एम.एच. वेगड विज्ञान महाविद्यालय उमरेड येथे होईल. कामठी विधानसभा मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र कामठी येथे होईल. रामटेक विधानसभा मतदार संघाची मतमोजणी कवी कुलगूरु कालीदास संस्कृत विद्यापीठ परसोडा, तहसील रामटेक येथे होईल.
दक्षिण पश्चिम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सामुदायिक भवन (कॉमुनिटी हॉल), सेंट्रल रेल्वे, अजनी नागपूर येथे होईल. नागपूर दक्षिण विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सांस्कृतिक बचत भवन, हरदेव हॉटेल समोर, सीताबर्डी नागपूर येथे होईल. नागपूर पूर्व विधानसभा निवडणुकीची मतमोजणी ईश्वर देशमुख महाविद्यालय, क्रीडा चौक, हनुमान नगर, नागपूर येथे होईल. नागपूर मध्य विधानसभा निवडणुकीची मतमोजणी जिल्हा परिषद (माजी शासकीय) माध्यमिक शाळा, नागपूर येथे होईल. नागपूर पश्चिम विधानसभा निवडणूक मतमोजणी एसएफएस कॉलेज, सेमीनेरी हिल्स, नागपूर येथे होईल. नागपूर उत्तर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सेंट उर्सुला मुलींची शाळा, सिव्हिल लाईन्स, नागपूर येथे होईल.
मतदान परिसरात चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून वाहतुकीसह इतर सुरक्षिततेच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कायदेशिर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
00000