Breaking News

पारडी येथील प्रस्तावित बाजारपेठेची मनपा आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर – नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२७ जून) पारडी येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रस्तावित ”भाजीपाला आणि मटण मार्केट” प्रकल्पासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडुन प्रस्तावित प्रकल्पासंबंधी सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.

पारडी नाका येथील आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पाहणी दरम्यान मनपाचे मुख्य अभियंता श्री. राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार, उपायुक्त श्री. मिलिंद मेश्राम, नगर रचना विभागाचे उपसंचालक श्री. प्रमोद गावंडे, सहायक आयुक्त श्री. विजय थूल, कार्यकारी अभियंता श्री. नरेश बोरकर, श्री. संजय माटे, श्री. राजीव गौतम, श्री. पंकज पराशर आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर-रायपूर महामार्गवरील मौजा भांडेवाडी येथील मार्केटसाठी आरक्षित असलेली ११,८८३ चौ.मी जागेवरील ५२ भूखंडाचा ताबा ललिता डेव्हलपर्स तर्फे २०१८ मध्ये घेण्यात आला असून, जागेवर अत्याधुनिक मार्केट विकसित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे. काही कारणास्तव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे मार्केटचे बांधकाम करण्यात आले नाही. आता या जागेवर मनापाद्वारे मार्केट विकसित करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे. मंजुर आराख्‌डया प्रमाणे विकसीत करावयाचे अत्याधुनिक मार्केट करीता आवश्यक जागापैकी मनपाचे नावे असलेली जागा व्यतिरिक्त राज्य शासनाच्या मालकीची जागा प्राप्त करण्याकरीता कार्यवाही पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सध्या इथे मांस विक्री करण्यात येत आहे.

 

पाहणी दरम्यान आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी परिसरात अत्याधुनिक बाजारपेठ निर्माण करण्यात येणार असून, लवकरच विविध विभागांशीं चर्चा करून संबंधित त्रुटी दूर करण्याचे आश्वासित केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गतचे सर्व प्रस्ताव 1 जुलै पर्यंत स्विकारले जाणार

नागपूर, दि.20 : जिल्हा वार्षिक योजना 2024-25 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या मर्यादेत येत्या 1 जुलैपर्यंत सर्व …

नागपूर जिल्ह्यासाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट

नागपूर, दि. 8 : भारतीय हवामान खात्याने जिल्ह्यामध्ये 9 मे रोजी वादळीवारा, वीज, गारपीट व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved