अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस
नागपूर, दि. 28 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी दि. २८ ऑक्टोबर रोजी 72 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले. आज दि. २९ आक्टोबर हा अर्ज दाखल करण्याचा शेवटाचा दिवस आहे. सोमवारला सर्वाधिक अर्ज हे नागपूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ११ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले.
काटोल विधानसभा मतदारसंघातून 7 उमदेवारांनी अर्ज आज दाखल केले. सावनेर विधानसभा मतदारसंघातून ३, हिंगणा ६, उमरेड ५, नागपूर दक्षिण पश्चिम ४,नागपूर दक्षिण ६, नागपूर पूर्व १०, नागपूर मध्य ५, नागपूर पश्चिम ३, नागपूर उत्तर ११ , कामठी ६, रामटेक ६ अशा एकूण 72 उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.
विधानसभा मतदारसंघनिहाय माहिती
रामटेक – विशाल बरबटे (शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे), आशीष जयस्वाल (शिवसेना), पंकज मासुरकर ( हिंदुस्थान जनता पार्टी), किशोर बेलसरे (अपक्ष), रोशन गाडे (अपक्ष), चंद्रपाल चौकसे अशा एकूण सहा उमेदवारांनी नामनिर्देशपत्र दाखल केले.
हिंगणा – नसीम आलम ( पीपल्स पार्टी आफ इंडिया (डेमोक्रॅटिक), माधुरी राजपूत (सोशलिस्ट युनिटी सेंटर आफ इंडिया एस यू सी आय ( कम्युनिस्ट), श्याम काळे ( कम्युनिस्ट पार्टी आफ इंडिया), राजेंद्र महल्ले ( जय विदर्भ पार्टी), सलीम शेख ( अपक्ष), बिजाराम किनकर (महाराष्ट्र नवनिर्माण सेना),
नागपूर दक्षिण पश्चिम – ओपुल तामगाडगे ( पिपल्स पार्टी आफ इंडिया (डेमोक्रेटिक) , विनय भांगे ( वंचित बहुजन आघाडी), प्रफुल्ल गुडधे ( इंडियन नॅशनल काँग्रेस), उषा ढोक अशा चार उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
नागपूर मध्य – प्रफुल बोकडे (अपक्ष), धर्मेद वासुदेव मंडलिक (पराते) (देश जनहित पार्टी), मोहम्मद इमरान मोहम्मद हारून कुरेशी ( विकास इंडिया पार्टी), हरीशचंद्र वेळेकर ( अपक्ष), शिवकाली कटारी ( अखिल भारतीय परिवार पार्टी)
नागपूर पश्चिम – नर्मदा चरोटे ( सोशलिस्ट युनिटी सेंटर आफ इंडिया कम्युनिस्ट), नरेंद्र जिचकर ( अपक्ष), राजेंद्र तिवारी (अपक्ष).
कामठी –सुरेश भोयर ( इंडियन नॅशनल काँग्रेस ), रघुनाथ सहारे ( अपक्ष), विजय डोंगरे ( आंबेडकराईट पार्टी आफ इंडिया) राजू वैद्य ( अपक्ष), अमोल वानखेडे ( रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया (ए), शौकत अली बागवान (अपक्ष)
काटोल– रमेश मरसकोल्हे (सार्वजनिक विकास समिती), धनंजय शेंडे (अपक्ष), वृषभ वानखेडे, विवेक गायकवाड ( वंचित बहुजन आघाडी), अनिरुद्ध पाटील ( राईट टू रिकॅाल पार्टी), राजश्री जिचकार ( अपक्ष), याज्ञवल्क्य जिचकार ( अपक्ष)
उमरेड – शशिकांत मेश्राम ( बहुजन समाज पार्टी), संजय बोरकर ( राष्ट्रीय समाज पक्ष), गणवीर वानखेडे ( बहुजन मुक्ती पार्टी), घनशाम राहाटे ( अपक्ष), सपना मेश्राम (वंचित बहुजन आघाडी).
सावनेर – भीमराव डोंगरे ( रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया (ए), अनिल बोडखे (बहुजन मुक्ती पार्टी), पंकज घाटोडे (आम आदमी पार्टी).
नागपूर पूर्व – तानाजी वनवे ( अपक्ष), तारेश दुरुगकर (देश जनहित पार्टी), अडव्होकेट सुरज मेश्राम (आल इंडिया फारवर्ड ब्लॅाक), नुश्यान हुमणे पीपल्स पार्टी आफ इंडिया (डेमोक्रेटिक), सागर लोखंडे ( अपक्ष), टेकराज उर्फ विक्की बेलखोडे (बहुजन मुक्ती पार्टी), संगीता वालदे ( भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), पुरुषोत्तम हजारे ( अपक्ष), गणेश हरकंडे ( वंचित बहुजन आघाडी), दुनेश्वर पेठे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार).
नागपूर दक्षिण – केतन पारखी (अपक्ष), अनुप दुरुगकर ( महाराष्ट्र नवनिर्माण सेना), कुणाल पाटील ( भीमसेना पक्ष), रेखा गोंगले ( रिपब्लिकन पार्टी आफ इंडिया (अ), सचिन निमगडे (बहुजन मुक्ती पार्टी), सुरेश बोधी ( आंबेडकराईट पार्टी आफ इंडिया).
उत्तर नागपूर – मुरलीधर मेश्राम ( वंचित बहुजन आघाडी), अतुल खोब्रागडे (अपक्ष), अनिल वासनिक (अपक्ष), त्रिशिल खोब्रागडे (आंबेडकराईट पार्टी आफ इंडिया ), अथांग करोडे ( अपक्ष), गुणवंत सोमकुवर ( भीमसेना), हरीश नक्के (अपक्ष), प्रवीण पाटील ( वंचित बहुजन आघाडी), सुधीर पाटील (देश जनहित पार्टी), मनोज सांगोळे ( बहुजन समाज पार्टी), प्रगती गौरखेडे ( अपक्ष)