विशेष प्रतिनिधी-नागपूर
नागपूर दि.28: जिल्ह्यात 12 विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. मतमोजणी 23 नोव्हेंबरला होणार आहे. निवडणूक कालावधीत म्हणजेच 18 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजेपासून 20 नोव्हेंबर रोजी मतदार प्रक्रिया पूर्ण होईपर्यत तसेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात दारू विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर यांनी जारी केले आहे.
दिनांक 18, 19, 20 व 23 नोव्हेंबर या दिवशी नागपूर जिल्ह्यातील सर्व अनुज्ञप्ती बंद राहतील, असे आदेशात नमूद आहे. या आदेशाचे उल्लंघन करुन मद्य विक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधिताची अनुज्ञप्ती रद्द करण्यात येईल, तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले आहे.