तेली समाजाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही – आ. बंटी भांगडिया
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग अंतर्गत चावळी मोहल्ला येथे रविवारी श्री संताजी जगनाडे महाराज सामाजिक सभागृह बांधकाचे भूमिपूजन आमदार बंटी भांगडिय यांच्या हस्ते पार पडले.याप्रसंगी श्री संत जगनाडे महाराज कल्याणकारी मंडळाचे पदाधिकारी तथा कार्यकत्यांनी आमदार बंटी भांगडिया यांचा शाल, श्रीफळ, संत जगनाडे महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला.
कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमदार बंटी भांगडिया उपस्थित होते, या सभागृहासाठी ६ कोटींचा निधी मंजूर झाला असून लवकरच कामाला सुरूवात होणार आहे.
याप्रसंगी आमदार बंटी भांगडिया म्हणाले, आपण यापूर्वी ४ कोटी रुपये तेली समाजाच्या विकासासाठी मंजूर केले. मात्र ते कोर्टात अडकले आहे. त्यानंतर आता पुन्हा ६ कोटी रुपये मंजूर केले. त्यामुळे आता ६ कोटी रुपयांचे सभागृह बांधण्यात येईल. कोर्टाचा निर्णय लागून ते ४ कोटी परत मिळाले तर, ती रक्कम आपण दुसरीकडे तेली समाजाच्या विकासासाठी कामात आणणार असल्याचे आश्वासन दिले. तेली समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द असून कदापि तेली समाजाच्या हितासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार बंटी भांगडिया यांनी दिली. कार्यक्रमांचे संचालन प्रणिता मानापुरे-पिसे व श्रुतिका बंडे यांनी केले. तर आभार भास्कर बावनकर यांनी मानले.
याप्रसंगी डॉ. राम कोल्हे, डॉ. गोपाल वाघमारे, डॉ. कैलाश गायधने, अनिल गभणे, भुपेश लाखे, श्रेयश लाखे, अमित जुमडे, यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.