jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
* पोलीसांची धडक कारवाई *
* ५० किलो खुले चोर बीटी बीयाणे किं. ९६,०००/- रुपयाचा माल जप्त *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- आज दिनांक २० मे, २०२५ रोजी पोलीस स्टेशन राजुरा हद्दीत मिळालेल्या गोपनिय माहितीचे आधारे पोलिसांनी नागो भिमा टेकाम रा. भुरकुंडा याचे राहते घराची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांच्या घरात एका प्लॉस्टीक चुंगडी मध्ये ५० किलो बीटी बियाणे (HTBT) किंमत ९६,०००/- रुपयाचा माल अवैध रित्या बाळगल्याचे आढळून आल्याने त्याचे कडे विचारपुस केली असता सदर माल हा तिरुपती नारायण अप्पलवार रा. सुकडपल्ली ता.राजुरा यांचा असल्याचे सांगण्यात आले असून मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेवुन सदर बियाणांची पडताळणी व कारवाई करण्यासाठी कृषी विभागाला माहिती देण्यात आली.
कृषी विभागाचे अहवालावरुन प्रतिबंधित कापूस (HTBT) बियाणे साठवणूक व जवळ बाळगणे शासनाची तसेच विक्री उद्देशाने शेतकऱ्यांची फसवणूक करण्याकरीता आरोपीतांनी हे बियाणे बाळगले अश्या कृषी अधिकारी नरेश रामकृष्ण ताजने यांचे अहवालावरुन दोन्ही आरोपीविरुध्द पोलीस स्टेशन राजुरा येथे विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुमित परतेकी, पोलीस स्टेशन राजुरा यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हाके,भिष्मराज सोरते, पोहवा विक्की निर्वाण, अविनाश बांबोळे, महेश बोलगोडवार, तिरुपती जाधव, शफीक शेख, शरद राठोड, आनंद मोरे व कृषी अधिकारी नरेंद ताजने, पंचायत समिती राजुरा यांनी केली आहे.