“तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार बंटी भांगडीया यांनी दिल्या सुचना”
“अडेगाव (देश ) येथील घटना -नदिच्या पुरात बैल गेला वाहून”
“आपद्ग्रस्तांना आमदार बंटी भांगडिया यांची तात्काळ आर्थिक मदत”
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यात मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामुळे चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडिया यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले.
खडसंगी परिसरातील -बरडघाट येथील अनेक शेतकऱ्यांचे शेतातील पिकांचे मुसळधार पावसाने नुकसान झाले त्यामुळे आमदार बंटी भांगडीया यांनी दिलेल्या सुचनेनुसार तलाठी वैभव कार्लेकर व कृषी सहाय्यकांनी खडसंगी परीसरातील शेतकऱ्यांच्या बांधावर चिखल तुडवत जावून झालेल्या नुकसानीचे – पंचनामे करण्यात आले.
“नदीच्या पुरात बैल गेला वाहून आमदार बंटीभाऊ भांगडिया यांची तात्काळ आर्थिक मदत”
ऐन शेतीच्या हंगामात अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या पुरात अडेगाव (देश) येथील शेतकरी गजानन मुळे यांचा बैल नदीच्या प्रवाहात वाहून गेला. त्या कारणाने बैलाचा मृत्यू झाला व त्यांचेवर आर्थिक संकट निर्माण झाले. याची माहिती सदर आमदार बंटीभाऊ भांगडिया यांना मिळताच त्यांनी आर्थिक मदत दिली.
“चिमूर तालुक्यातील गरजवंताना मदतीचा हात”
सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे शेतकरी बांधवांचे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले तसेच काही घरांची पडझड झाली असून नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीता आमदार बंटी भांगडीया यांनी संबंधित यंत्रणांना पंचनामे करण्याचे निर्देश दिले. सततधार येणाऱ्या मुसळधार पावसाने नदी, नाल्यास पूर आल्याने चिमूर तालुक्यातील सातारा, मासळ, करबडा, मदनापूर, विहिरगाव, नेरी, लोहारा, आंबोली, गावातील शेतीची व पडलेल्या घराची पाहणी त्यांनी केली. व जामगाव कॅनल फुटला असल्याने शासकीय यंत्रणाला पंचनामे करण्याचे निर्देश दिले.
पूरग्रस्त पाहणी दौऱ्यात शेतकरी बांधवांशी व गावाकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर घाडगे, तहसीलदार श्रीधर राजमाने, ठाणेदार संतोष बाकल, कृषी अधिकारी सरोज सहारे, सिंचाई उपविभागीय अभियंता पी.जी. मेश्राम, बीडीओ सहारे, तलाठी मंडळ अधिकारी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.