अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव:- दिनांक 15 ऑगस्ट वार गुरुवार या बाबत सविस्तर वृत्त असे की काल दिनांक 14 ऑगस्ट बुधवार रोजी शहरातील लक्ष्मी – नारायण मंगल कार्यालयात क्रांती नाना माळेगावकर पुणे यांचा भव्य खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी बोलताना जि प च्या माजी अध्यक्षा व कार्यक्रमाच्या संयोजिका सौ राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील यांनी बोलताना आपण ठरवले तर तालुक्याचे गतवैभव परत मिळवू शकतो. ही खुणगाठ बांधायची आहे. चहुबाजूंनी केवळ तालुक्याचे लचके तोडण्याचे काम सुरू असताना शिवबा घडवण्याची ताकद असलेली जिजाऊ शांत बसून कशी चालेल. म्हणून पुन्हा चंद्रशेखर घुले यांना आमदार केल्याशिवाय थांबलेले विकासाचे चक्र पुन्हा सुरू होणार नाही. त्यामुळे मुलाबाळांच्या आणि तालुक्याच्या भविष्याची ही लढाई आपल्या हातात घ्यायची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा राजश्री घुले यांनी केले.
माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून न्यू होम मिनिस्टर, खेळ पैठणीच्या बक्षीस वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सौ.नीलिमा नरेंद्र पाटील घुले होत्या. सौ.तेजस्विनी क्षितिज घुले, आशा भोसले, शुभदा देशमुख राजश्री रसाळ वंदना भारदे मनीषा आढाव, शीतल थोरात, उषा मडके, रागिणी लांडे, उज्ज्वला मेरड, वसुधा सावरकर, ज्योती धूत, मंगल धूत, प्रीती गजभीव, प्रीती राठी आदी प्रमुख उपस्थित होत्या. यावेळी क्रांतीनाना माळेगावकर व सह्याद्री मळेगावकर यांचा सत्कार करण्यात आला. जर्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा. दीपक कुसळकर यांनी केले त्यांचाही सन्मान करण्यात आला उपस्थित मान्यवर महिला यांचा सत्कार सौ.राजश्री घुले, तेजस्विनी घुले, माजी आमदार चंद्रशेखर घुले, क्षितिज घुले, अरुण लांडे, काकासाहेब नरवडे, संजय कोळगे आदींच्या हस्ते देण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यशस्वितेसाठी चंद्रशेखर घुले पाटील मित्र मंडळ व क्षितिज घुले युवा मंचतर्फे परिश्रम घेण्यात आले. तेजस्विनी घुले यांनी प्रास्ताविक केले. उज्ज्वला मेरड यांनी आभार मानले.महिलांच्या विविध स्पर्धा पैठणी साड्यांसह प्रथम रोहिणी सचिन तोतरे (शेवगाव), द्वितीय : अनिता अरुण मोटकर (लाखेफळ), तृतीय श्रद्धा पानकर (दहिगावने), चतुर्थ भाग्यश्री प्रदीप वांढेकर (वाघोली), पाचवे : वैशाली भारत मोटकर (घोटण) आदींसह उत्तेजनार्थ स्पर्धकांना फ्रीज, वॉशिंग मशिन, शिलाई मशीन, कुलरसह विविध बक्षिसे वाटप करण्यात आली.
*ताजा कलम*
माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण सप्ताहभर विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा शेवगाव पाथर्डी परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे यामध्ये तालुक्यातील विविध प्राथमिक शाळांना मदत विविध सामाजिक संघटनांना मदत कुस्ती स्पर्धेचे आयोजन आणि महिलांसाठी मनोरंजनात्मक आणि प्रोत्साहन पर बक्षिसांचा कार्यक्रमांचे आयोजन बोधेगाव शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यामध्ये करण्यात आले आहे
*अविनाश देशमुख शेवगाव*
*सामाजिक कार्यकर्ता / पत्रकार*