जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा १६ ऑगस्ट ला चिमूर तालूका काँग्रेस कमेटीच्या वतीने शहीदांना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम घेण्यात येतो.चिमूर तालुका काँग्रेसच्या वतीने दिनांक. १६ ऑगस्ट ला शहीदांना श्रध्दांजली वाहण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.नामदेवरावजी किरसान प्रमुख म्हणून हजर राहणार होते.चिमूर चे माजी आमदार व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे विद्यमान महासचिव डॉ. अविनाश वारजूकर उपस्थित राहणार होते. म्हणून श्रद्धांजली पर कार्यक्रमाची परवानगी मिळावी यासाठी दिनांक. १९/०७/२०२४ ला १ वाजुन १८ मिनीटांनी तालूका काँग्रेस कमेटी व खासदार डॉ.नामदेवराव किरसान यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुप्रिया राठोड यांना रितसर पत्र दिले तेव्हाच मुख्याधिकारी यांनी सांगीतले कि लगेच तुम्हाला परवानगी देतो.
परंतु परवानगी दिलीच नाही आणि ४ ते ५ दिवसांनी तालुका काँग्रेस कमेटीने विचारणा केली असता परवानगी करीता पहिले पत्र आमदार साहेबांचे आहे असे सांगीतले तेव्हा काँग्रेस पार्टी तर्फे सांगितले कि त्यांना परवानगी दया आणि आम्हाला तसे कळवा परंतु मुख्याधिकाऱ्यांनी आम्हाला कळविण्याचे औचीत्य सुध्दा दाखविले नाही. परंतु नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी परवानगी दिल्याचे आजतागायत कळविले सुद्धा नाही.सदर बाब नगर परिषदेने कोणत्या नेत्याच्या दबावात हे कृत्य केले त्याचा करविता धनी कोण? हा प्रश्न चिन्ह निर्माण झाला असून यावरून असे कळते कि सत्तेचा दुरुपयोग कसा होतो व श्रध्दांजली वाहण्याची परवानगी इतर लोकांना मिळत नाही हे स्पष्ट होते. तरीही काँग्रेस कमेटी हि श्रध्दांजली वाहणार असुन हयाच दिवशी काळे झेंडे दाखवून काँग्रेस पार्टी प्रशासनाचा निषेधही व्यक्त करणार असे ठरले होते.
परंतु शहीदांना श्रध्दांजली वाहण्याच्या दिवसाचे औचीत्य लक्षात घेवून आणि आपली जबाबदारी सांभाळून लोकशाही मार्गाने शहीद दिनी तालुका काँग्रेस पार्टी हि प्रशासनाचा निषेध करणार असल्याने यामुळे शहीद दिनाला कुठल्याही प्रकारे गालबोट लागणार नाही याची दक्षता घेत हि भूमिका पार पाडली जाईल. कुणाच्या दबावाखाली ? काँग्रेस कमिटीचा मोठा कार्यक्रम होणार नाही म्हणून मुख्याधिकारी यांनी याबाबत ची परवानगी दिली नाही.असे आरोप तालुका काँग्रेस कमिटी तर्फे पत्रकार परिषदेत केले.या पत्रकार परिषदेला डॉ.सतीश वारजुकर चिमूर विधानसभा समन्वयक , राम राऊत सर सरचिटणीस महाराष्ट्र सेवा दल काँग्रेस , विजय पाटील गावंडे तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी चिमूर, गजानन बुटके सरचिटणीस चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ,विलास मोहिनकर तालुका सरचिटणीस , अविनाश अगडे,पप्पू शेख , जावा शेख , राजु चौधरी, विवेक कापसे, ॲड.धनराज वंजारी, अक्षय लांजेवार,राकेश साटोने, श्रीकांत गेडाम, गुरुदास जुनघरे, रामदास ठुसे, रोहन नन्नावरे ,शार्दूल पचारे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.