अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की सेवा व शहरातील प्रभाग क्रमांक एक मगर वस्ती प्रभाग क्रमांक तीन भीम योद्धा नगर प्रभाग क्रमांक चार ढाकणे वस्ती प्रभाग क्रमांक 18 केस भट वस्ती प्रभाग क्रमांक 21 निकाळजे वस्ती प्रभाग क्रमांक 20 इंदिरानगर प्रभाग क्रमांक 10 रामनगर आणि श्याम नगर प्रभाग क्रमांक 11 लांडे वस्ती प्रभाग क्रमांक 14 भारदे हायस्कूल रोड प्रभाग क्रमांक 04 म्हसोबा नगर विखे पाटील कॉलेज रोड प्रभाग क्रमांक 02 खुंटेफळ रोड डाके मळा आदी भागातील अंतर्गत रस्ते सतत च्या रिपरिप पावसाने चिखलमय झाले
असून जून 2015 मध्ये स्थापन झालेल्या नगरपरिषदे मार्फत कोट्यवधी रुपयांची बोगस रस्त्याची आणि अंडरग्राउंड गटारीची कामे झालेली असून शहरांमधून वाड्या वस्त्यांकडे जाणारे सर्वच रोड अतिशय खराब अवस्थेत असून शाळेत ये जा करणारी शाळकरी मुलं या भागातील शेतकरी वर्ग आबालवृद्ध महिला यांना शहरात संपर्क करण्यासाठी चिखलमय रस्ते उघड्या व तुंबलेल्या गटारी यामधून वाट शोधात यावे लागते आपल्या समस्या नेमक्या कोणाकडे मांडाव्यात यशोदा या प्रभागातील आणि वाडी वस्ती वरील लोकांना कळत नाही त्यांचा कोणीही अधिकारी कर्मचारी व गाव पुढारी ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत इलेक्शन जवळ आल्याने थातूर मातूर आंदोलनात आला आहे परंतु शहराच्या मूलभूत प्रश्नांना कोणीही हात घालण्यास तयार नाही.
*ताजा कलम*
शहरात गेल्या काही वर्षात रस्त्यांची कामे झालेली आहेत परंतु त्यातील अक्षम्य चुकांमुळे शहराच्या अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून दलदल तयार झाली आहे याकडे नगरपरिषद शेवगाच्या आरोग्य विभाग अतिक्रमण विभाग बांधकाम विभाग सार्वजनिक बांधकाम विभाग शेवगाव यांचे साफ दुर्लक्ष झाल्याने व त्यावर तालुक्याच्या लोकप्रतिनिधींचा अंकुश नसल्याने सहनशील शेवगावकर यांना वेठीस धरण्याचा ऑटो कट प्रयत्न सुरू असून विकास कामांचा डोंगर उभा केलेला वल्गना करणारे कोणत्या बिळात जाऊन बसले आहेत असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*