अविनाश देशमुख शेवगांव 9960051755
शेवगाव:- याबाबत सविस्तर वृत्त असे की वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मा उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांना वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाण यांच्या नेतृत्वात लेखी निवेदन देण्यात आले या प्रसंगी सोपानराव काळे, शेवगाव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, रवींद्र निळ, युवा तालुका अध्यक्ष सागर गरूड, सचिन कणसे, अवधूत केदार, दत्तात्रय औटी, बाबासाहेब थोरात,गहीनिनाथ कातकडेसर, वसंत औटी, सचिन शिंदे, अशोक कापरे,अन्सारभाई कुरैशी, साईनाथ भागवत,व इतर शेतकरी बांधव व व्यवसाईक उपस्थित होते यावेळी प्रा किसन चव्हाण म्हणाले की, शेवगाव, पाथर्डी, नेवासा तालुक्यातील ज्यांची शेअर मार्केट मध्ये फसवणूक झाली असेल त्यांनी न घाबरता धाडसाने पुढे येऊन कुणाच्याही दबावाखाली न जाता,बुधवार दि ७-८-२०२४ रोजी शेवगाव येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी उपस्थित रहावे शेवगाव पोलिस स्टेशन येथे शेअर मार्केट मध्ये फसवणूक करणाऱ्या व्यक्तींच्या तक्रारी न घेणाऱ्या शेवगाव पोलीस निरीक्षक तसेच पोलिस कर्मचारी यांच्या विरोधात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
*ताजा कलम*
शेवगाव पोलीस स्टेशनला नियुक्त असलेल्या काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे शेअर मार्केट मध्ये पैसे असल्यामुळे इतके दिवस कारवाईला टाळाटाळ होत होती गेल्या पाच सहा महिन्यांत बऱ्याच व्यक्तींनी शेअर मार्केटच्या फसवणुकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत या संकटातून वाचण्यासाठी आत्महत्या हा पर्याय नाही काहीही अडचण असल्यास माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन ही प्रा किसन चव्हाण यांनी केले या बाबत मा मुख्यमंत्री,मा गृहमंत्री,मा पोलीस महासंचालक नासीक,मा पोलिस अधीक्षक अहमदनगर, यांना इमेल द्वारे लेखी निवेदन देण्यात येणार आहे असे वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुका अध्यक्ष म्हणाले.
{ क्रमशः }
*अविनाश देशमुख शेवगांव*
*सामाजिक कार्यकर्ता पत्रकार*