Breaking News

भंडारा राज्य परिवहन विभागाचा साकोली बसस्थानक ब वर्गात राज्यात प्रथम

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा)- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक स्वच्छ्ता अभियान राबविण्यात आला या अभियानात” उत्कृष्ठ कामगीरी. करणाऱ्या एस.टी. बसस्थानकाला महामंडळा‌द्वारे गौरविण्यात येणार होते या अभियाना अंतर्गत “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानात” रा.प.भंडारा विभागातील साकोली बसस्थानक ‘ब’ वर्गवारीत प्रथम पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. त्यामुळें याविभागात कार्यरत अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतिचा कौतुक केले जात आहे.साकोली बसस्थानकाला रू.२५ लाख पुरस्काराची रक्कम मिळणार आहे.महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष यांच्या संकल्पनेतुन 1 मे 2023 ते 30एप्रिल 2024 या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे एस.टी. महामंडळाच्या सर्व बसस्थानकावर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात आले होते.

लोक सहभागातून बसस्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारीत राबविण्यात आलेल्या या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बसस्थानक व बसस्थानक परिसराचे सुशोभिकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेत बाग-बगीचा, वृक्षारोपण, प्रवाश्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, घडयाळ, सेल्फी पॉईंट हि कामे करण्यात आली. या बरोबरच प्रवाश्यांना मिळणाऱ्या सेवासुविधा, बसेस ची स्वच्छता, तांत्रिक दुरूस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळया रा.प.विभागाच्या सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बसस्थानकांचे मुल्यांकन करण्यात आले. या मुल्यांकनात दिलेल्या गुणांकनाच्या आधारे राज्य स्तरावर व प्रादेशिक स्तरावर प्रत्येक गटात तीन क्रमांक निवडण्यात आले.त्यात भंडारा विभागातील साकोली बसस्थानक ब वर्ग गटातून राज्यातून प्रथम आहे.हि स्पर्धा राज्यभरातील 563 बसस्थानकांवर घेण्यात आली असुन या सर्व बसस्थानकांचे त्या बसस्थानकांवरील प्रवासी फेऱ्यांच्या संख्येवरून अ, ब, क असे वर्गीकरण केले होते. पहिल्या पातळीवर प्रदेशनिहाय प्रत्येक गटामध्ये तीन क्रमांक काढण्यात आले. प्रत्येक प्रदेशातील प्रत्येक गटातील पहिल्या कमांकाच्या बसस्थानकाला राज्य स्तरावरील अंतीम फेरीसाठी निवडण्यात आले. त्यामधुन सर्वाधिक गुण मिळविणारे बसस्थानक राज्य स्तरावर पहिल्या क्रमांकासाठी निवडण्यात आले.या अभियानात तब्बल अडीच कोटी रूपयांची बक्षिसे देण्यात येणार असुन १५ ऑगष्ट रोजी बक्षिसपात्र बसस्थानकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

‘ब’ वर्गात रा.प.भंडारा विभागातील साकोली बसस्थानक राज्यात प्रथम स्थानी राहिले. प्रदेशनिहाय मुल्यांकनात रा.प. गोंदिया बसस्थानकाने ‘ब’ वर्गात तृतीय क्रमांक पटकाविला. प्रदेश स्तरावरील ‘क’ वर्गातील तीनही पुरस्कार भंडारा विभागातील साकोली आगारांतर्गत लाखनी, देवरी व अर्जुनी मोरगाव या बसस्थानकांनी पटकाविले आहेत. या बसस्थानकांनाही रोख पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
या अभियानात रा.प.भंडारा विभागातील पाच बसस्थानके रूपये ३३ लाख २५ हजार बक्षिसास पात्र ठरली आहेत. पुरस्कार विजेत्या बसस्थानकांचे एस. टी. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी अभिनंदन केले.यशस्वी बसस्थानकाला मुख्यमंत्री तथा एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून मे 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीमध्ये एस.टी. महामंडळाच्या सर्व बसस्थानकांवर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान” राबविले गेले.यामध्ये भंडारा विभागातील पाच बसस्थानक चांगली कामगीरी करून बक्षिस पात्र ठरलेली आहेत. भविष्यात प्रवासी बांधवांना चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. अशी ग्वाही रा.प.भंडारा. विभाग नियंत्रक तनुजा अहिरकर, कामगार अधिकारी पराग शंभरकर यांनी दिले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहरातील अनेक प्रभागातील अन उपनगरातील रस्त्यांची दुरावस्था नगरपरिषद प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग गाढ झोपेत नागरिक त्रस्त

  अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- याबाबत सविस्तर वृत्त असे की सेवा व शहरातील …

मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान तर काही घरची पडझड

“तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी प्रशासकीय अधिकाऱ्यांना आमदार बंटी भांगडीया यांनी दिल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved