Breaking News

1 जुलै ला शाळेची घंटा वाजली,शिक्षक करतील विद्यार्थ्यांचा स्वागत

प्रकाश साठवणे गटशिक्षणाधिकारी यांनी मुख्याध्यापकांना केला हितोपदेश

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा) – दि. 29 /06 /2024 शनिवारला शाळा पूर्वतयारी या संबंधाने तुमसर नगरपरिषद व्यवस्थापन तसेच खाजगी व्यवस्थापन शाळेचे मुख्याध्यापक यांची सभा न.प.कस्तुरबा विद्यालय तुमसर येथे प्रकाश साठवणे गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती तुमसर यांचे अध्यक्षतेखाली पडली.सभेत शाळा प्रवेशोत्सव समारंभ पूर्वक साजरा करण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले .तसेच शालेय पोषण आहार,सरल पोर्टल, विविध शिष्यवृत्ती योजना अशा विविध विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.पंतप्रधान शालेय पोषण आहार योजना संदर्भात विधायक सूचना देण्यात आल्या.पाठ्यपुस्तक बाबत आढावा घेण्यात आला.PAT परीक्षा संदर्भात माहिती देण्यात आली. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेवून त्याला शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी प्रत्येकानी प्रयत्न करावे असा हितोपदेश प्रकाश साठवने गटशिक्षणाधिकारी यांनी केला.

यावेळी मुख्याध्यापक राहुल डोंगरे आणि मुख्याध्यापक चंद्रकांत भट यांनी तुमसर तालुक्याच्या वतीने गटशिक्षणाधिकारी प्रकाश साठवने यांचा शाल व पुष्पगुच्छ देवून विशेष सत्कार केला.यावेळी देवानंद सावके प्रशासन अधिकारी न.प.तुमसर. टी.आर.पुष्पतोडे शिक्षण विस्तार अधिकारी, रामरतन भाजीपाले, कु.खोब्रागडे, कु.बिसेन व तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते.शालेय विभागा कडून मिळालेल्या सुचने नुसार विद्यार्थ्यांचे स्वागत मोठ्या उत्साहाने प्रत्येक शाळेत विविध कार्यक्रमाचे आयोजन, सजावट, ब्यांड पथकाच्या द्वारे व विद्यार्थ्यांना गोड अन्न शालेय पोषण आहार रुचकर तयार करून विद्यार्थ्यांना खावू घालणार असल्याचे माहिती आहे.कार्यक्रमाचे संचालन शरणागत यांनी केले तर आभार प्रदर्शन कु.संगिता बागडे यांनी केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मतदार जनजागृतीसाठी चार हजार विद्यार्थ्यांची मानवीय साखळी

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 18 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीसाठी जिल्हा …

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणच्या कार्यकारी अध्यक्षपदी न्या. भूषण गवई यांची नियुक्ती

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी सर्वोच्च न्यायालयाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved