जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ
राळेगाव/चहांद :- यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या चहांद येथे स्वातंत्र्य दिनानिमित्य विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले.यावेळी जिल्हा परिषद शाळेचे सहाय्यक शिक्षक खेरे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाजत गाजत रॅलीचे आयोजन केले. प्रभात फेरी शाळेमधून गावातील चौकातील ध्वजारोहणसाठी उपस्थित झाली. नंतर सरपंच सौ. रुपालीताई राउत यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर भारताच्या संविधानाचे वाचन करण्यात आले.शाळेतील सहाय्यक शिक्षिका अमृता धोंटे यांनी ग्रामगितेवर आधारित समाज प्रबोधनात्मक भाषण केले आपल्या भाषणात गावातील वाईट सवयी विषयी कान उघडणी केली.
शाळेसामोरील परिसरात मोठ्या प्रमाणात होणारी हागनदारी हा मुख्य विषय घेऊन गावाकऱ्यांना अत्यंत मार्मिक शब्दात खडसावले नंतर प्रभात फेरी ग्रामपंचायत मध्ये जाऊन तेथील ध्वजारोहण उपसरपंचा सौ. सुदर्शना सुभाष कांबळे यांचे हस्ते करण्यात आले. त्यानंतर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चहांद चे मुख्याध्यपाक खेमचंद चिमणे यांनी सर्व गावकऱ्यांना शाळेतील ध्वजरोहना करिता निमंत्रित केले.महामानवाच्या प्रतिमेचे व झेंड्याचे पूजन करून शाळेतील ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर बोरकुटे यांनी केले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्याने शाळेतील लहान लहान विद्यार्थी, विद्यार्थिनींनी भाषणे व देश भक्तीपर गीते सादर केली. शाळेतील शिक्षिका जयाताई वाघमारे यांनी अतिशय संयमी शब्दात पालकांनी व गावाकऱ्यांनी विद्यार्थ्यांना संस्कारक्षम कसे बनवावे या विषयावर उत्कृष्ट असे भाषण केले स्वातंत्र्य दिना विषयी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
शाळेतील सदैव मदतीसाठी तत्पर असलेले शिक्षक मंगेश खेरे यांनी आपल्या कोकणी भाषेत मार्गदर्शन केले, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भास्कर बोरकुटे तर प्रमुख पाहुणे समितीचे उपाध्यक्ष शशिम कांबळे. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ. रुपाली राउत, उपसरपंच सौ. सुदर्शना कांबळे, ग्रामपंचायत सदस्य सौ. कवित्ता चांदेकर, निखिल शेळके, प्रमोद येडे, कलावती चामाटे तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्रातील कर्मचारी कु. मयुरी घोडे, खेमराज रामटेके आशा वर्कर, श्रीमती प्रभावती चांदेकर, गावातील समाजसेवक राहुल पाटील, शंकर राउत, मनमोहन चांदेकर,, अंकुश आत्राम, वासुदेव सातघरे, रूपक चिपडे इ. उपस्थित होते.शिक्षक वृंद खेरे सर, जया वाघमारे, अमृता धोटे, दीपाली दैवलकर,सूत्रसंचालन शाळेचे मुख्याद्यापक खेमचंद चिमणे यांनी केले तर आभार स्वप्नील सिडाम यांनी केले.