jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
” सुखदुःखाचे अश्रू डोळ्यात घेऊन गावकऱ्यांनी जवानास दिला निरोप “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- नुकत्या पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांत धर्म विचारुन निष्पाप भारतीयांची निर्घुणपणे हत्या केली. त्यामुळे भारत पाकिस्तान मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. भारत सरकारने त्याचाच प्रत्युत्तर देण्यासाठी सिंदुर ऑपरेशन सुरू केले. युद्ध परीस्थिती निर्माण झाल्यामुळे रजेवर गेलेल्या सर्व भारतीय जवानांना वापस बोलाविण्यात आले आहे.
चिमूर तालुक्यातील विहिरगाव येथील भारतीय जवान याचे नुकतेच दिनांक ०७/०५/२०२५ रोजी लग्न समारंभ पार पडले व आज दिनांक ११/०५/२०२५ ला सिमेवर जाण्याकरिता अमोल तुकाराम नन्नावरे झाला सज्ज. यावेळी जवानाचे नातेवाईक व संपूर्ण गावकरी सुखदुःखाचे अश्रू डोळ्यात घेऊन जवानास औक्षवंत करून दिला निरोप. यावेळी अमोल ने माझ्यासाठी परिवार महत्वाचा आहे. परंतु देश माझ्यासाठी प्रथम त्यामुळे देश सेवेसाठी मी जात आहों. अशी प्रतिक्रिया व्यक्त केली