जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार – नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
धुळे – सध्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात युध्दसदृश्य स्थिती असून पाकिस्तानी हॅकर्स यांनी भारतीय नागरीकांना सोशल मिडीयाच्याव्दारे फसवण्यास सुरुवात केलेली आहे. जेणेकरुन भारतीय नागरीकांची आर्थिक फसवणुक होण्याची दाट शक्यता आहे. म्हणूनच ऍड. भंडारी यांनी नागरीकांना आवाहन केले आहे की आपल्याला अज्ञात नंबरव्दारे (म्हणजे अननोन नंबर वरून) “डान्स ऑफ द हिलरी” असे मजकुर लिहून येणारे व्हिडीओ, फोटो किंवा लिंक येत असेल तर ते डाउनलोड किंवा क्लिक करु नका.
आपण फेसबुक, इन्स्टाग्राम वापरत असतांना कुठल्याही चुकीच्या पोस्टला लाईक, कमेंट आणि शेअर करणे टाळा किंवा शेअर करु नका, व्हॉटसअँप किंवा इतर सोशल मिडीया वेबसाईट वापरत असतांना अज्ञात नंबरव्दारे “ऑपरेशन सिंदूर”च्या नावाने येणा-या बनावट व फसव्या एपीके फाईल्स किंवा पीडीएफ फाईल्स डाउनलोड करु नका कारण त्यात वायरस असू शकतो. ज्याद्वारे तुमच्या फोनमधील गुपित माहिती चोरली जावू शकते. म्हणून नागरीकांनी व्हॉटस अँपपच्या सेंटींग्जमध्ये जावून टू फॅक्टर ऑथेंटिकेशन नेहमी ऑन ठेवावे, आपल्या फोनमध्ये ऑटो डाउनलोडचे ऑप्शन बंद ठेवा जेणेकरुन तुमच्या फोनमध्ये आपोआप कुठल्याही फाईल्स डाउनलोड होणार नाहीत. तसेच अज्ञात नंबरव्दारे फोटो किंवा व्हिडीओ येत असेल तर डाउनलोड करु नये.
देशाचे शूर सैनिक सीमा रेषेवर देशाचे रक्षण करत आहे तर आपण ही सर्व मिळून आपले कर्तव्य पार पाडू आणि देशाला सायबर सुरक्षित बनवू असे आवाहन अॅड. चैतन्य भंडारी यांनी केले आहे आणि जर आपल्यासोबत काही सायबर फसवणुक झाली असेल तर आपण राष्ट्रीय टोल फ्री क्र. १९३० किंवा महाराष्ट्र सायबर हेल्पलाईन नं. १९४५ या टोल फ्री क्रमांकावर आपली तक्रार न चुकता नोंदवावी.
जागृत रहा,. सुरक्षित रहा… जय हिंद