jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
” अन्यथा शिवसेना उबाठा महिला आघाडीचा आंदोलनाचा इशारा “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील गेले मागील 15 दिवसापासून घंटा गाड्या बंद आहे. त्यामुळे शहरातील नाल्या आणि रस्त्यांवर घरगुती कचरा टाकण्यात येत आहे.घंटा गाड्या बंद असल्याने नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
तात्काळ घंटा गाड्या सुरू न केल्यास शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निवेदनाच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी महिला आघाडी जिल्हा प्रमुख वर्षा ठाकरे,वरोरा तालुका प्रमुख सरला मालोकर,वंदना चॉधारी,शारदा गोहाने, शिला आगलावे,लता ठेंगने,वर्षा आत्राम,प्रगती शिंदे, रजनी डंभारे व सोबत अनेक महिला शिवसैनिक उपस्थित होत्या.