Breaking News

सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या माजी सैनिकांनी शाळकरी विद्यार्थ्यांना केले खाऊचे वाटप

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ

राळेगाव:- राळेगाव तालुक्यातील वडकी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त माजी सैनिक मेजर जीवन कोवे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप.आगामी विधानसभा च्या निवडणुका लक्षात घेता इच्छुक उमेदवारांनी आपल्या विधानसभा क्षेत्रामध्ये गाठीभेटी वाढविल्या असून लोकांमध्ये जनसंपर्क वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम यांच्या तर्फे कार्यक्रम आयोजित केल्या जात आहे.

त्याच अनुषंगाने आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त माजी सैनिक मेजर जीवन कोवे भावी उमेदवार राळेगाव विधानसभा क्षेत्र यांनी वडकी येथील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून बिस्कीटचे व चॉकलेटचे वाटप करण्यात आले यावेळी त्या ठिकाणी माजी सैनिक मेजर जीवन कोवे तसेच माजी सैनिक मेजर चव्हाण हे प्रामुख्याने उपस्थित होते तसेच चंद्रशेखर कोवे, रियाज खा पठाण, सोमेश्वर केराम, अरुण केराम, बबलू चांदेकर, विलास चांदेकर, संजय कोरडे, आकाश कोवे, दिलीप केराम, अशोक वानखडे, हबीब पठाण, मनोज क्षीरसागर,बंडू कुळसंगे, मोहन शेंडे, यादवराव भगत गणेश तोडासे, खेमराज कोवे, विलास जुमनाके हे उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved