Breaking News

वैनगंगा उच्च प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनानिमीत्त ध्वजारोहण उत्साहात

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा ) – आदर्श बहुउद्देशीय मंडळ आंबेडकर वार्ड भंडारा द्वारा संचालित वैनगंगा उच्च प्राथमिक शाळा टप्पा वार्ड भंडारा येथे भारतीय स्वातंत्र्याचा ७८‌ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर होते. आदर्श बहुउद्देशीय मंडळाच्या उपाध्यक्ष श्रीमती प्रेमाताई वाडिभस्मे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श बहुउद्देशीय मंडळाचे सचिव मनोज वाडिभस्मे, सेवानिवृत्त मुख्याध्यापिक आर. जी. रामटेके, डॉ. कल्पना कोल्हे, मुख्याध्यापिका सविता गभणे, पालकवर्ग अनिल मोगरे, श्रृती राघोर्ते, शिक्षक वृंद, पालक वर्ग तथा विद्यार्थी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला.
उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजाला सलामी देऊन सामुहिक राष्ट्रगित गायन केले. यानंतर ढोलताशांच्या गजरात शहरात प्रभातफेरी काढून तसेच हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत नवसाक्षरांना साक्षरतेचा संदेश देण्यात आला.

यावेळी कार्यक्रमाचे सुत्र संचालन एम.डी.डोंगरवार यांनी केले तर उपस्थितांचे आभार निलीमा शेंडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मनोज खवास, भाग्यश्री साठवणे, अंगणवाडी सेविका वैशाली नंदनवार, भाग्यश्री इंदोरकर, सुकेशना चवरे, वर्षा गभणे, भावना नेमा, कविता मांढरे, नंदिनी सोनवाणे, करण नेवारे, पूनम सोनवाणे, जिविका वरवाडे, तिशांत बाभरे, हिना मडामे, राजविर निंबार्ते, सिमरण आकरे, कल्पना सोनवाणे, सोनाक्षी शेंडे, कुणाल कोकाटे, त्रिशा आकरे व शाळेतील शिक्षक, कर्मचारीवृंद तसेच विद्यार्थी -विद्यार्थ्यींनींनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved