Breaking News

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी काढला रूट मार्च

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर :- चिमूर शहरासहित तालुक्यात शांतता सुव्यवस्था प्रस्थापित व्हावी. आणि आगामी होणारे सन उत्सव शांततेत पार पाडावे यासाठी बंदोबस्त करण्यासाठी चिमूर पोलिस नेहमी सज्ज असतात. त्याच अनुषंगाने गणेशोत्सव. ईद ए मिलाद निमित्त चिमूर पोलिसांनी रुठ मार्च काढला.या रूट मार्चला हुतात्मा स्मारक चिमूर येथून सुरुवात झाली.

त्यानंतर इंदिरा गांधी चौक. नेहरू चौक. शहीद बालाजी रायपूरकर चौक. मार्केट लाईन. छत्रपती शिवाजी महाराज चौक. चावडी मोहला. संताजी जगनाडे महाराज चौक. मासल रोड ने मार्गक्रमण करीत अटल बिहारी वाजपेयी चौक येथे रूट मार्चच समारोप करण्यात आला. या रूट मार्च मधे पोलिस उपविभागीय अधिकारी राकेश कुमार जाधव. पोलिस निरीक्षक संतोष बाकल यांचें सह सहाय्यक पोलिस निरीक्षक. पोलिस उप निरीक्षक. दंगा नियंत्रण पथक.पोलिस हवालदार. पोलिस शिपाई. होमगार्ड पथक सहभागी झाले होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तातडीने निर्णय घ्या

शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश जिवतोडे यांची गोंडवाना विद्यापीठाला मागणी जिल्हा प्रतिनिधी – सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- …

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved