Breaking News

स्माईल फाउंडेशनला शासनाचा जिल्हा युवा (संस्था) पुरस्कार

50 हजार रोख व सन्मानचिन्ह देऊन सन्मान

जिल्हा प्रतिनिधी-शशिम कांबळे यवतमाळ

राळेगाव:-यवतमाळ जिल्हातील तालुका वणीतील विविध सामाजिक व पर्यावरण विषयक उपक्रम राबवणा-या स्माईल फाउंडेशनला 15 ऑगस्टला यवतमाळ येथे जिल्हा युवा पुरस्कार (2020-21) देऊन सन्मानित करण्यात आले. 50 हजार रोख, सन्मानचिन्ह व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे झालेल्या सोहळ्यात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. स्माईल फाउंडेशनचे अध्यक्ष सागर जाधव यांच्या आईं पुष्पा जाधव व स्माईल फाउंडेशनच्या चमूनी हा पुरस्कार स्वीकारला.

जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे दरवर्षी जिल्ह्यातील एक युवक, एक युवती व एका संस्थेला युवा पुरस्कार दिला जातो. सागर जाधव यांच्या स्माईल फाउंडेशन या संस्थेला 2021-22 या काळातील विविध समाज हिताोपयोगी उपक्रम, युवकांच्या विकासासाठी कार्य यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. कोरोना काळात स्माईल फाउंडेशनने विविध मदतकार्य केले होते. लॉकडाऊनच्या काळात अनेकांना शिधा वाटप, अन्न वाटप केले होते. यासह संपूर्ण वर्ष भर संस्थेद्वारे विविध शैक्षणिक व पर्यावरणविषयक उपक्रम राबवण्यात आले होते.

त्यांच्या या कार्याची क्रीडा व युवक कल्याण संचलनालय, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांनी दखल घेत स्माईल फाउंडेशनचा स्वातंत्र्य दिनी सन्मान करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यलयात झालेल्या सोहळ्यात पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते तसेच जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड व जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी स्माईल फाउंडेशनच्या पुष्पा जाधव, अर्चना पिदुरकर, रोहित ओझा, गौरव कोरडे,हिंगे यांची उपस्थिती होती. प्रामाणिक कामाची पावती – सागर जाधव हा पुरस्कार म्हणजे स्माईल फाउंडेशनने प्रामाणिकपणे केलेल्या विविध कामांची पावती आहे. संस्थेचे्या विविध उपक्रमांसाठी अनेकांनी वेळोवेळी मदत केली. अनेकांनी स्वयंस्फुर्तीने पुढाकार घेत संस्थेच्या कार्यात हातभार लावला. त्यामुळे हा पुरस्कार संस्थेच्या कायम पाठिशी राहणा-यांना, संस्थेची चमू आणि सर्वसामान्यांना समर्पित करतो. या पुरस्कार संस्थेला प्रोत्साहन देणारा असून असून भविष्यात आणखी लोकहितोपयोगी उपक्रम राबवले जाईल.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

ईद-ए-मिलाद निमित्त 16 सप्टेंबर रोजी सुट्टी

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर , दि. १४ – राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद …

मयत मच्छिंद्र तुकाराम ससाणे यांचे मारेकरी आणि पाथर्डी व शेवगाव परिसरात धुमाकुळ घालणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद

अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव :- या बाबत सविस्तर वृत्त असे की पकडलेल्या टोळीकडून तिसगाव, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved