Breaking News

निवृत्ती वेतनधारकांनी हयात असल्याचे प्रमाणपत्र सादर करावे

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि. 21 : चंद्रपूर कोषागार अंतर्गत बँकेद्वारे निवृत्ती वेतनधारकांना 1 नोव्हेंबर 2024 रोजी हयात असल्याच्या प्रमाणपत्राची (Life Certificate) यादी संबंधित बँकेस माहे ऑक्टोबर अखेर पाठविण्यात आली आहे. सदर यादीवर निवृत्तीवेतन धारक/कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी मोबाईल क्रमांक, पॅन क्रमांक, आधार क्रमांक नमुद करून 30 नोव्हेंबर 2024 पूर्वी स्वत: उपस्थित होऊन स्वाक्षरी करावयाची आहे. जेणेकरून हयात असल्याच्या प्रमाणपत्राची यादी कोषागाराला वेळीच प्राप्त होईल व त्यांचे माहे डिसेंबर 2024 पासूनचे निवृत्तीवेतन बँकेकडे वेळीच पाठविता येईल. तसेच जे निवृत्ती वेतनधारक मनिऑर्डरद्वारे निवृत्ती वेतन घेतात त्यांनी आपले हयात प्रमाणपत्र राजपत्रित अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत कोषागाराला पाठवावे.

असा सादर करता येईल हयातीचा दाखला : आपले पेन्शन खाते असलेल्या बँकेच्या शाखेत जाऊन बँक अधिकाऱ्याच्या समक्ष हयात दाखल्याच्या यादीतील आपल्या नावासमोर स्वाक्षरी करा. बँकेत जाऊ शकत नसल्यास जीवनप्रमाण या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने पुढीलप्रमाणे हयात दाखला सादर करा.

1. https://jeevanpraman.gov.in या संकेतस्थळावर लॉगइन करा. 2. GENERAL LIFE CERTIFICATE वर क्लीक करा. 3 तुमचा आधार क्रमांक टाका. 4. तुमच्या मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी टाका आणि तुमचा हयातीचा दाखला काही सेंकदात प्राप्त करा.

तुमच्या जवळच्या जिल्हा कोषागार कार्यालय किंवा उपकोषागाराला भेट द्या. हयात दाखल्यावर बँक अधिकारी किंवा राजपत्रीत अधिकाऱ्याच्या समक्ष स्वाक्षरी करून जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करा. काही कारणानिमित्त परदेशात असल्यास तेथील भारतीय राजदुतामार्फत हयातीचा दाखला संबंधित जिल्हा कोषागार कार्यालयात सादर करा. हयात प्रमाणपत्र 5 डिसेंबर 2024 पर्यंत कोषागारास प्राप्त न झाल्यास त्यांचे माहे डिसेंबर 2024 पासुनचे निवृत्तीवेतन बॅंकेकडे पाठविले जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी, असे जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी कळविले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सराईत गुन्हेगाराला रामनगर पोलीसांनी केले गजाआड

  jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar ” घरफोडी, जबरी चोरीसह मोटासरायकल चोरी असे एकूण …

संडे स्पेशल दणका वर्षानुवर्षे पिण्याच्या पाण्यासाठी झुलवत ठेवणाऱ्या शेवगांवच्या सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या गावपुढाऱ्यांचा मणका

!!! फक्त उदघोषना बाकी असलेल्या शेवगांव नगरपरिषदेची निवडणूक ऐन पावसाळयात होण्याची शक्यता !!! अविनाश देशमुख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved