jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
” ८ लक्ष ५२ हजार ७९० रुपयाची मालमत्ता जप्त “
” पोलीस ठाणे गोंडपिपरी ची कार्यवाही “
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चंद्रपूर :- आज दिनांक १२ एप्रिल, २०२५ रोजी मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन पोलीस स्टेशन गोंडपिपरी अंतर्गत मौजा विठठलवाडा फाटा येथे नाकाबंदी करुन चारचाकी वाहन पिकअप क्र. एम.एच.२४-जे-९५६४ यास थांबवुन पंचासमक्ष पाहणी केली असता सदर वाहनात विना परवना, अवैधरित्या देशी, विदेशी दारु व बिअर असा एकुण ३,५२,७९०/- रुपयाचा देशी विदेशी दारुचा साठा अवैध रित्या वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने आरोपी नामे भावेश दिलीप वानोडे वय २७ वर्ष रा. चंद्रपूर यास अटक करुन त्याचे ताब्यात चारचाकी वाहन पिकअप आणि देशी विदेशी दारुचा साठा असा एकुण ८,५२,७९०/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला असुन आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्या अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन गोंडपिपरी चे ठाणेदार सपोनि रमेश हत्तीगोटे यांचे नेतृत्वात पोअं विलास कोवे, अतुल तोडासे, प्रशांत नैताम, सचिन झाडे, सुनिल गव्हारे, सचिन गायकवाड, मनिषा ठाकरे व सैनिक दुर्याधन चलाख यांनी केली आहे.