Breaking News

योग दिनात ५०० नागरिकांनी केली योग प्रात्यक्षिके

जिल्हास्तरीय कार्यक्रमाला प्रतिसाद

जिल्हा प्रतिनिधी/जयेंद्र चव्हाण
मो.9665175674

(भंडारा ) – दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित जे. एम. पटेल महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित जिल्हास्तरीय कार्यक्रमाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये साधारणत: पाचशेच्यावर नागरिकांनी सहभाग घेऊन योगासनांची सामूहिक प्रात्यक्षिके केली.

योग दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी लीना फलके, जे. एम. पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास ढोमणे, जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, पतंजली योग समितीचे जिल्हा प्रभारी रत्नाकर तिडके, डॉ. रमेश खोब्रागडे, नेहरू युवा केंद्राचे रमेश अहिरकर, डॉ. भगवान मस्के, जे. एम. पटेल महाविद्यालयातील हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पन्निकर, वैशाली गिऱ्हपुंजे, डॉ. भीमराव पवार, प्राध्यापक रोमी बीस्ट,योगा शिक्षक विलास केजरकर, डॉजितेंद्र किरसान प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थितांचे वृक्षरोपे देऊन प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. स्कूल ऑफ स्कॉर्सची विद्यार्थीनी कामाक्षी मदनकर हिने योग नृत्य सादर केला.त्यानंतर डॉ. रमेश खोब्रागडे, वैशाली गिऱ्हपुंजे, भोजराज झंझाळ यांनी योग्य प्रात्यक्षिके करून दाखविले. योगमय वातावरणात ५०० हून अधिक नागरिकांनी सक्रिय योगासने करून सहभाग नोंदवला. यामध्ये ग्रीना संचालन, स्कंद संचालन स्कंदचक्र, कंधी चालन, घुटना संचालन, तारा संरक्षण, पादस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, भद्रासन, अनुलोम, विलोम, कपाल भाती, भ्रामरी प्राणायाम, शीतली प्राणायाम इत्यादी योग प्राणायामचा अभ्यास करण्यात आला.

यावेळी योग शिक्षकांचे यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते वृक्षरोपे व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत पर्यावरण पंधरवडा निमित्त महाविद्यालयाच्या परिसरात विविध प्रजातीचे वृक्षारोपण करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक भोजराज श्रीरामे व प्रास्ताविक डॉ. रमेश खोब्रागडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जे. एम. पटेल महाविद्यालयातील हमी कक्षाचे समन्वयक डॉ. कार्तिक पन्निकर यांनी मानले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, नेहरु युवा केंद्र, जे. एम. पटेल महाविद्यालय, पतंजली योग समिती, सांस्कृतिक चिकित्सालय लायन्स क्लब, जिल्हा योग संघटना, संत गुलाब बाबा युवा प्रशिक्षण केंद्र, आर्ट ऑफ लिव्हिंग तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, जे. एम. पटेल महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण विभाग, एन.सी.सी विभाग, एन. एस.एस. विभाग, व माजी विद्यार्थी संघटना, प्राध्यापक व योगसाधक- साधिकांनी सहकार्य केले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

चिमूर शहरात ले आऊट मालका कडून शासकीय नियम धाब्यावर – मुलभूत सुविधेचा अभाव

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर :- ले आऊट मालक भूखंडाची विक्री करतात तेव्हा प्राथमिक सुविधा उपलब्ध …

चंद्रपूर जिल्हा 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- IMD कडून चंद्रपूर जिल्हा करिता पुढील 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved