jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर :- चिमूर तालुक्यातील विहीरगाव फाट्या जवळील पोल्ट्री फार्म जवळ दिनांक ३० मार्च रोजी सायंकाळच्या ५.३० वाजताच्या सुमारास चारचाकी स्कॉपिओ वाहनाने दुचाकी वाहनास जबरधडक दिली असता अपघातात रीया राकेश जुमडे वय ३२ वर्षे ही महिला जागेवरच ठार झाली. मृतक महिलेचा पती व लहान मुलगा गंभीर जखमी आहे
MH 33 – F-5151 या क्रमांकाची स्कॉर्पीओ चारचाकी वाहन असून गाडी चालकावर १०६,१२५ (ए) १२५ (बी), बीएन.एस., आर.डब्लु. १८४ एम. व्ही. ॲक्ट नुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत गाडी चालक हा फरार असल्याचे सांगण्यात आले असून त्याचा शोध घेणे सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक मल्हारी नारायण ताळीकोटे करीत आहे.