jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
यवतमाळ :- दिनांक १ एप्रिल जिल्हा परिषद यवतमाळ समोर आज दिनांक ०१ एप्रिल (सोमवार) पासून शिक्षक संघटनांच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण आणि धरणे सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे.शिक्षकांच्या प्रलंबित पदोन्नती,विषय शिक्षक वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करणे, तसेच विस्तार अधिकारी,केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक पदोन्नतीसाठी हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.यावेळी उपोषणकर्त्यांमध्ये सुनिता गुघाणे (बुटले),जया रोहणकर, संध्या केशववार,वंदना नाकतोडे, छाया उम्रतकर,राजश्री कोमावार यांचा समावेश आहे.जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटनांचा या आंदोलनाला पाठिंबा प्राप्त आहे.शिक्षक संघटनांनी यापूर्वी अनेक वेळा आपल्या मागण्यांसाठी निवेदने सादर केली होती.२० जानेवारी २०२५ रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण करण्यात आले होते, त्यावेळी आमदार बाळासाहेब मांगूळकर यांच्या उपस्थितीत प्रशासनाने १० फेब्रुवारी २०२५ पर्यंत सर्व मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.मात्र,दोन महिने उलटूनही ठोस कार्यवाही न झाल्याने शिक्षक संघटनांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
मुख्य मागण्या:
विषय शिक्षक वेतनश्रेणीतील त्रुटी दूर करून सेवाजेष्ठ विषय शिक्षकांचा समावेश करणे आणि सुधारित आदेश तात्काळ जारी करणे.
उर्दू माध्यमाच्या विषय शिक्षकांचे वेतनश्रेणी आदेश ०५ एप्रिल २०२५ पर्यंत काढणे.विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया ०५ एप्रिल २०२५ पर्यंत समुपदेशन घेऊन पूर्ण करणे.केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी सेवाजेष्ठता यादी ०३ एप्रिल २०२५ पर्यंत प्रसिद्ध करून १५ एप्रिल २०२५ पर्यंत समुपदेशन घेऊन पदोन्नती आदेश काढणे.माध्यमिक शिक्षक,उच्च श्रेणी मुख्याध्यापक, उच्च माध्यमिक शिक्षक तसेच विस्तार अधिकारी (श्रेणी-3, वर्ग-3) या सर्व पदांच्या याद्या माध्यमनिहाय प्रसिद्ध करणे.
वरील मागण्या दि.३१ मार्च २०२५ पर्यंत मान्य न झाल्यामुळे,०१ एप्रिल २०२५ पासून बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.शिक्षक संघटनांनी प्रशासनाने यावर तत्काळ कार्यवाही करावी,अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.यावेळी महेंद्र वेरुळकर,पुंडलिक रेकलवार,महेश सोनेकर,देवराव डेबरे,विकास दरणे,नरेंद्र परोपटे, पुंडलीक बुटले, गजानन पोयाम,आसाराम चव्हाण, मो.रफिक,सय्यद शेरू,महेश खोडके,राजेश उरकुडे,मनीष लढी, युवराज पत्रे,रुपेश हिवरकर, देवेंद्र ठाकरे चंद्रशेखर उम्रतकार,अरुण मेश्राम, अरुण महल्ले,शरद घरोड,तुषार आत्राम,सुनील राठोड,शशिकांत खडसे,विकास झाडे,महेश शिरभाते,संजय पांडे, विनोद डाखोरे,मुकेश भोयर,लक्ष्मण काटकर,किरण मानकर,विठ्ठल थेटे प्रकाश सालपे, विकास झाडे उपस्थित होते.