Breaking News

दोन आरोपींना विनयभंग प्रकरणी तीन वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा

 

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर : – चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येत असलेल्या केवाडा पेठ येथे विनयभंग तथा मारहाण प्रकरणी दोन आरोपिंना तीन वर्षे सक्षम कारावासाची शिक्षा दिवाणी व फौजदारी न्यायालय, चिमूर ने ठोठावली यातील आरोपी क्र.(१) धोंडु श्रावण चौधरी, वय-५० वर्षे राहणार केवाडा (पेठ) आरोपी क्र.(२) सचिन केवाजी मोहुरले, वय-२२ वर्षे राहणार केवाडा (पेठ) तालुका चिमुर जिल्हा चंद्रपूर यांच्या विरुद्ध
भारतीय दंड विधान कलम ३५४ (ब), ५०६, ३४ अन्वये चिमुर पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंद झालेला होता. व गुन्ह्यातील सखोल तपासानंतर सहायक पोलीस निरीक्षक सुनिल झुरमुरे पोलीस स्टेशन चिमुर यांनी प्रथमवर्ग न्यायवंडाधिकारी न्यायालय, चिमुर येथे आरोपी विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले.

सदर प्रकरण न्यायालयात सरकार पक्षातर्फे फिर्यादी व इतर साक्षदाराचे साक्षपुरावे घेण्यात आले.फिर्यादी व इतर साक्ष पुराव्याच्या आधारे माननीय श्रीमती आर. व्ही. डफरे, न्यायदंडाधिकारी साहेब प्रथमश्रेणी, चिमुर यांनी दिनांक. २८/०३/२०२५ रोजी आरोपी नामे क्र.(१) धोंडु भ्रावण चौधरी, वय-५० वर्षे रा. केवाडा (पेठ) आरोपी नामे क्र.(२) सचिन केवाजी मोहुर्ले, वय-२२ वर्षे रा. केवाडा (पेठ) तालुका चिमुर जिल्हा चंद्रपुर यांना सदर प्रकरणात कलम ३५४(ब) भारतीय दंड विधान अन्वये दोषी ठरवुन आरोपींना प्रत्येकी ३ वर्षाची सश्रम कारावास व प्रत्येकी १०००/- रू. दंड इतकी शिक्षा ठोठावली सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे श्री.के.व्ही. तोकलवार, सहाय्यक सरकारी अभियोक्ता, चिमुर यांनी बाजु मांडली व पोलीस निरीक्षक संतोष बाकल, पोलीस स्टेशन चिमुर यांच्या मर्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी म्हणुन बलदेव कुमरे, पोलीस हवालदार, पोलीस स्टेशन चिमुर यांनी काम पाहीले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

जिल्हा परिषद समोर शिक्षकांचे बेमुदत साखळी उपोषण व धरणे सत्याग्रह

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे यवतमाळ :- दिनांक …

जि.प. प्राथमिक शाळा झुल्लर येथे शैक्षणिक शिक्षण परिषद

  jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे वडकी :- …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved