Breaking News

दोन दिवसांपासून बेपत्ता युवकाचा तलावात सापडला मृतदेह

  • दोन दिवसांपासून बेपत्ता युवकाचा
    तलावात सापडला मृतदेह
    मूल :–दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका युवकाचा
    तलावात मृतदेह सापडल्याची घटना
    तालुक्यातील 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या डोंगरगाव येथे घडली.
    मृत युवकाचे नाव सुनील मानिक धुर्वे वय 27 वर्षे , रा. डोंगरगाव असे आहे.हा अविवाहित तरुण घरी न सांगता घरातून निघून गेला असता आज दिनांक 22/3/2021 ला त्याचे शव गावालगत असलेल्या तलावांमध्ये तरंगत असताना निदर्शनास आल्याचे गावातील व्यक्तींनी सांगितले. वडील आणि मृतक सुनील आणि त्याचा मोठा भाऊ मजुरी करून कुठूम्बाचे उदरनिर्वाह करीत असत, काही दिवसापासून सुनील विचार करीत असायचा असे घरच्यांनी सांगितले, मानसिक अवस्थेत दि. 20/3/2021ला तो घरून निघून गेला. त्यामुळे घरच्यांनी सगळ्या नातेवाईकाकडे शोधाशोध केली परंतु त्याचा कुठेही, कोणत्याही नातेवाईकाकडे पत्ता लागला नाही. म्हणून घरचे हतबल झाले. आज दोन दिवसानंतर दि. 22/3/2021 ला सुनील चे मृत शरीर गावालगत असलेल्या तलावामध्ये तरंगत असल्याचे काही शेताच्या कामावर जाणाऱ्यांच्या व्यक्तींच्या निदर्शनास आले. त्यांनी गावात घटनेची माहिती दिली. ते बघितल्या नंतर खात्री पटली. की मृतदेह सुनीलचा आहे. घरच्यांनी मूल पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करून शवविच्छेदना करिता मूल येथे मृतदेह आणण्यात आले. मेजर श्रीधर मडावी यांनी तपास करून मृत देह अंत्यविधी करिता घरच्यांच्या स्वाधीन करण्यात आले. मात्र त्यांनी आत्महत्या केली की घातपात आहे, याविषयी शंका निर्माण केली आहे. मृत्यूचे कारण अजूनही समजू शकले नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीशसिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनात श्रीधर मडावी करीत आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

मासळ चौकातील देशीभट्टी स्थलांतरीत करण्यात यावी – विलास मोहिणकर

उपविभागीय अधिकारी यांना दिले निवेदन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर : – दिनांक.२७/०६/२०२४ नगर परिषद चिमुर …

बहुजन विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पासून वंचित ठेवण्याचा घाट-कवडू लोहकरे

“परदेशी शिष्यवृत्तीसाठी ७५ टक्के गुणांची अट” जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चिमूर:- राज्य सरकारने इतर मागासवर्गीय, अनुसूचित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved