Breaking News

प्रवाश्यांचे पॉकेट चोरणाऱ्या टोळीला पोलीसांनी केली अटक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar

 

” चोरीस गेलेला १८,००० रुपयांचा पोलिसांनी केला जप्त “

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर :- दिनांक २४ मे, २०२५ रोजी फिर्यादी यशवंत बाबुराव भरणे यांनी पोलीस स्टेशन मुल येथे येवुन तक्रार नोंदविली की, दिनांक २४/५/२०२५ रोजी १६:३० वाजता सुमारास मुल बस स्थानकावरुन बस मध्ये चढत असतांना कोणीतरी अज्ञान चोरटयांनी त्यांच्या पॅन्टचे मागचे खिशात असलेले नगदी १८,०००/- रुपये चोरुन नेले अशा रिपोर्ट वरुन अपराध क्र. २०४/२०२५ कलम ३०३ (२) भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करुन तात्काळ घटनास्थळी पोहचुन तपास करण्यात आला.

तपासात, गोपनिय माहितीवरुन मुल बस स्थानक समोर चंद्रपूर रोडवर चंद्रपूर दिशेस जाणेकरीता वाहनाची वाट पाहणारा इसम नामे शरद वाघुजी रुयारकर वय ४५ वर्ष रा. वरोरा हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतील असता त्याचेकडे चोरी केलेले १२५००/- रुपये नगदी मिळुन आले. तसेच सदर इसमाची तांत्रीक पध्दतीने गुन्हे अभिलेख तपासले असता सदर इसमावर मालमत्तेचे, तसेच चोरीचे गुन्हे दखल असुन त्याचा साथीदार नामे ज्ञानेश्वर उर्फ नाना गुलाब मडावी, आणि विजय उर्फ विजु सुधाकर बेलेकर याचे सोबत चोरी करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपीस वरोरा येथुन ताब्यात घेवुन त्यांनाही अटक करण्यात आली आहे. आरोपीकडुन सदर गुन्हयातील चोरीस गेलेला १८,०००/- रुपये नगदी जप्त करण्यात आले असुन पुढील तपास मुल पोलीस करीत आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक सुबोध वंजारी, पोहवा जमीरखान पठाण, भोजराज मुंडरे, नापोअं चिमाजी देवकते, पोअं नरेश कोडापे, संदीप चुधरी सर्व पो.स्टे. मुल यांनी केली आहे.

तरी, नागरीकांना आवाहन करण्यात येते की, बस मध्ये चढत-उतरत असतांना मौल्यवान वस्तुची काळजी घ्यावी. मागील खिशात पैसे, पॉकेट, मोबाईल ई. ठेवु नयेत. काही संशयीत आढळून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपूर येथील डायल ११२ वर कॉल करुन माहिती दयावी.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी ६,६०,०००/-रूपयाचे सोन्याचे व चांदीचे दागीने केले जप्त

  jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- दिनांक ३१/०५/२०२५ रोजी …

“हर घर संविधान” उपक्रमातंर्गत नवदाम्पत्यांना एक अनोखी भेट

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   विशेष प्रतिनिधी – नागपूर नागपूर :- डी. एस. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved