
आमदार मा.बंटीभाऊ भांगडीया यांनी नागभीड तालुक्यातील मौजा-नवेगाव (हुंडेश्वरी) येथील काही दिवसांपूर्वी घरे जळलेल्या कुटुंबीयांची घेतली भेट
नागभीड:यश कायरकर
चिमुर विधानसभा क्षेत्रातील आमदार श्री *मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार साहेब* . हे चिमुर विधानसभा क्षेत्रात जनतेच्या कोणत्याही मदतीला तत्पर पोहचून आर्थिक मदत,गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत ही भाजपा पदाधिकारी- कार्यकर्ते मार्फत नेहमी करीत आहेत.
अशातच काही दिवसांपूर्वी नागभीड तालुक्यातील मौजा- नवेगाव (हुंडेश्वरी) येथील *श्रीमती.मंदा विनोद आदे व श्रीमती.ललिता राजीराम लेनगुरे* यांचे अचानक घराला आग लागल्याने त्यांच्या घरातील सर्व मूलभूत गरजू वस्तू व अन्न धान्य किराणा जळून खाक झाले असल्याने ह्या दोन्ही परिवारांवर दुःखाचे डोंगर कोसळले होते.तेव्हा त्या गरीब कुटूंबातील लोकांची घरे जळल्याने त्या कुटूंबांचे मदतीकरिता गावातील भाजपा पदाधिकारी यांनी आमदार साहेबांना माहिती दिली असता तात्काळ *मा.बंटीभाऊ भांगडीया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र* यांचे सूचनेनुसार *श्री.संतोष भाऊ रडके भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड* यांचे मार्गदर्शनात भाजपा पदाधिकारी यांनी संबंधित कुटूंबियांना अन्न-किराणा व मूलभूत गरजा पूर्ण करणे करिता आर्थिक मदत भाजपा जनसंपर्क कार्यालय नागभीड येथे दिली होती.
तसेच आज *मा.बंटीभाऊ भांगडीया* आमदार साहेबांचा नागभीड तालुक्यात नियोजित दौरा असल्याने आमदार साहेबांनी मौजा-नवेगाव (हुंडेश्वरी) येथील श्रीमती.मंदा विनोद आदे व श्रीमती.ललिता राजीराम लेनगुरे यांची भेट घेऊन जळलेल्या घरांची पाहणी केली व लवकरात लवकर शासनाकडून नवीन घरे बांधून देण्याचं आश्वासन दिले व गावातील नागरिकांच्या समस्या ह्या जाणून घेतल्या.
भेट घेतांना उपस्थिती म्हणून :-
*श्री.संतोष भाऊ रडके भाजपा तालुकाध्यक्ष नागभीड,श्री.आवेश पठाण सभापती कृ.उ.बा.स. नागभीड,श्री.मदनजी अवघडे भाजपा जेष्ट नेता,श्री.विनोद हजारे शक्तिकेंद्र प्रमुख,श्री.अशोक पांडव बूथ अध्यक्ष, सौ.कल्लुताई नेवारे (सरपंच),श्री.मंगल बुराडे, श्री.मोरेश्वरजी उईके श्री.राजू सोनूले, श्री.कैलास सोनूले* तसेच गावातील नागरिक व भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.