jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
जिल्हा प्रतिनिधी – शशिम कांबळे
राळेगाव :- राळेगाव तालुका अंतर्गत येत असलेल्या मौजा गट ग्रामपंचायत कळमनेर येथे पाणी समस्या अत्यंत गंभीर असून गावातील संपूर्ण नागरिकांना पिण्याचे पाणी गावाबाहेर असलेल्या एका हॅन्ड पंप वरून आणावे लागते.30 तीस हजार लोकसंख्या असलेल्या राळेगाव शहराला याच कळमनेर गावावरून पाणीपुरवठा होतो.लाखो रुपये खर्च करून गावकऱ्यांनी स्वतःच्या घरी पाणी मिळावे मनुन बोर खोदले मात्र संपूर्ण गावातच मोठ्या प्रमाणात क्षारयुक्त पाणी असल्याने ते पिण्यायोग्य नाही,वर्धा नदीच्या काठावर असणाऱ्या या गावातील नागरिकांची पाण्याबाबतची अवस्था धरण उशाला अन कोरडं घशाला या स्वरूपाची झाली आहे.ही समस्या शेकडो वर्षांपासून जैसे तेच आहे.
मागील दोन वर्षा अगोदर महाराष्ट्र शासनातर्फे राबविल्या जात असलेली पाणी पुरवठा योजना अर्थात जलजीवन मिशन योजनेचे काम कळमनेर येथे सुरू झाले सदर योजनेच्या कंत्राट दारामार्फत गावातील प्रमुख मार्गाचे अत्यंत चांगले सिमेंट कोंकरेंट चे रोड फोडून पाईप लाईन टाकण्यात आली गावाच्या एका टोकाला विहीर व पाण्याची टाकी देखील करण्यात आली मात्र सदर काम अनेक महिन्या पासून कंत्राट दाराकडून बंद असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी नशिबी असलेला संघर्ष कधी मिटेल असा आर्त सवाल कळमनेर येथील गावकरी करू लागले आहे.कळमनेर गावाला लागूनच वर्धा नदीचे मोठे पात्र आहे ‘जल ही जीवन है’ असे म्हटले जाते अन्न,वस्त्र,निवारा,या मूलभूत गरजा सोबत जगायला शुद्ध पाणी मिळावे हा मानवाचा मूलभूत हक्क आहे.
मात्र स्वातंत्र्या पासून या गावात नळ योजना मिळू शकली नाही हे या गावचे दुर्दव आहे त्यामुळे कळमनेर येथे पिण्याच्या पाण्याची समस्या अत्यंत गंभीर आहे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी एकमेव पर्याय ठरलेल्या हातपंपावर दिवसभर महिलांसह वयोवृद्ध नागरिकांच्या रांगा लागतात गावाच्या एका टोकावरून पिण्याचे पाणी आणण्याचा त्रास सहन करणे हे या गावचे प्रारब्ध बनले आहे.राळेगाव शहराला पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन याच गावातून गेली असून,गावसीवारातच असलेले वर्धा नदीचे महाकाय जलकुंभ या ग्रामस्थांना जणू हिनवते आहे.वर्धा नादिसारखे बारमाही पात्र डोक्यासी असतांना केवळ शासकीय अनास्थेमुळेच कळमनेर वासीयांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे त्यामुळे संबंधित प्रशासनाने कळमनेर येथील पाणी समस्या सोडविण्या बाबत उपाययोजना कराव्या अशी मागणी गावकऱ्यांची आहे नाहीतर नदी उशाला आणि कोरड घशाला अशीच मानण्याची वेळ कळमनेर येथील नागरिकांवर आली आहे.