गावातील युवकांच्या अंगावर ट्रॅक चालवीण्याचा प्रयत्न,
पोलीस स्टेशन भिसी कडून ट्रॅक ड्रायवर व अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक जप्त
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर /भिसी:-वैनगंगा नदीपात्रातील ‘रेती’ या राष्ट्रीय संपत्ती ची कांपा- शंकरपूर-भिसी ह्या मार्गाने नागपूर,उमरेड,गिरड, सिर्शी या ठिकाणी मोठया प्रमाणात अवैध पद्धतीने रेती वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांची संख्या वाढली असून रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅकांची संख्या शेकडो च्या संख्येनी वाढतंच चालली आहे.हा प्रकार मागील 6 महिन्यापासून जोरात सुरु आहे.
“विशेष म्हणजे सरकारी सुट्टी ही या तस्करांसाठी हैप्पी डे असतो.”
आज दी.29/03/2024 रोज शुक्रवार ला सकाळी गुड फ्रायडे या सरकारी सुट्टीचे फायदा घेत रेतीने भरलेली वीस,बावीस ट्रॅक पुयारदंड, गडपिपरी, आंबोली व भिसी या परिसरात आडमार्गाने लपण्याचा प्रयत्न दोन तासापासून करीत होती.
याच वेळी पुयारदंड गावाजवळ गोठाणगाव फाट्याजवळ सकाळी 10 वा. अवैध रेतीने भरलेला ट्रॅक MH 40 Y 9891 हा उभा असता गावातील युवकांनी विचारपूस केली असता ड्रायवर नी ट्रॅक चालू करून कोणतीही परवा न करता युवकांच्या अंगावर ट्रॅक चालवीण्याचा प्रयत्न करून पळ काढला. त्या युवकांनी आरडा ओरड केली असता गावातील महिला, पुरुष यांनी रोड कडे धाव घेतली. तेव्हा ट्रॅकचे फोटो काढण्याचा प्रयत्न करीत असलेले पत्रकार यांचे अंगावरही ट्रॅक चालवीण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आपल्याला संरक्षनासाठी दगड फेक केली तेव्हा ट्रॅक ड्रायवर नी ट्रॅक थांबावीला व ट्रॅक ची चावी घेऊन पळून गेला.सदर घटनेची माहिती भ्रमण ध्वनीवरून S P साहेब चंद्रपूर जिह्वा यांना दिली असता त्यांनी भिसी पोलीस स्टेशन ला माहिती देऊन कारवाईचे आदेश दिले. भिसी पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी आपले कर्मचारी घटनास्थळी पाठवून ट्रॅक व ड्रायवर या दोघांनाही जप्त केले.
सदर घटनेची लेखी तक्रार पुयारदंड गावकर्यांकडून पोलीस स्टेशन ला देण्यात आली. यानंतर अश्या प्रकारचे अवैध रेतीने भरलेली ट्रॅक या रोड नी चालायला नको.दिलेल्या तक्रारीची दाखल घेऊन ट्रॅक ड्रायवर व ट्रॅक यावर उचित कारवाई करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार व गावकर्यांकडून केली जात आहे.यावेळी शिवसेनेचे (उबाठा गट )उपजिल्हा प्रमुख प्रशांतभाऊ कोल्हे, विधानसभा संघटक प्रकाश नान्हे सर, विधानसभा समन्वयक भाऊरावभाऊ ठोंबरे,उप तालुका प्रमुख राजेंद्र जाधव, शहर प्रमुख नितिन लोणारे, मनोज तिजारे,रोशन जुमडे व सर्व कार्यकर्ता गण व गावातील महिला, पुरुष व युवक उपस्थित होते.
========================================
सदर घटनेच्या तक्रारीवर उचित कारवाई करण्यात येईल. व यापुढे अवैध्य रेती ट्रॅक या रस्त्यानी जाणार नाही व जात आहे अशी माहिती मिळाल्यास भिसी पोलीस यंत्रणेकडून उचित कारवाई करण्यात येईल.
“रमीज मुलाणी”
ठाणेदार पोलीस स्टेशन भिसी..