Breaking News

सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधानच्या ‘लग्न कल्लोळ’चे ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर जोरदार स्वागत

मुंबई-राम कोडींलकर

मुंबई:-लवकरच लग्नसराईची धुमशान संपूर्ण महाराष्ट्रात सुरु होणार आहे. त्यापूर्वीच ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीने संपूर्ण महाराष्ट्रात जबरदस्त गाण्यांसाह सर्वत्र धुमाकूळ घातलेल्या ‘लग्न कल्लोळ’ या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करून आपल्या ओटीटी प्रेक्षकांना सरप्राईज गिफ्ट दिले आहे. महाराष्ट्रातील चित्रपट रसिक प्रेक्षक हा सुवर्णयोग मनस्वी अनुभवत आहेत.श्रुती आणि अथर्व एकमेकांवर प्रेम करतात आणि ते लग्न करणार आहेत. श्रुतीला एक जुळी बहीण आहे,

तिचे लग्न घटस्फोटाच्या उंबरठ्यावर आहे. जुळी असल्यामुळे श्रुती आणि तिच्या बहिणीची कुंडली सारखीच आहे, त्यामुळे अथर्व आणि श्रुतीचे लग्न होऊन घटस्फोट होण्याची शक्यता आहे. खरंच अशी घटना घडेल की घटनेला एक वेगळं वळण मिळेल? चित्रपटात सिद्धार्थ जाधव, भूषण प्रधान, ऐश्वर्या आहेर आणि सुप्रिया कर्णिक यांच्या प्रमुख भूमिका असून चित्रपट मोहम्मद बर्मावाला आणि मयूर तिरमखे यांनी दिग्दर्शित केला आहे. तसेच प्रिया बेर्डे, अमिता कुलकर्णी, प्रतिक्षा लोणकर आणि भारत गणेशपुरे हे लोकप्रिय कलाकारही चित्रपटात दिसणार आहेत.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इनामी देवस्थान जमिनी प्रकरण

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगाव 9960051755 शेवगाव:-माननीय सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल.रेकॉर्ड ऑफ राईट ला कब्जेदार,वहिवाटदार, मालक, …

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved