Breaking News

रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी

नागपूर, दि. 29 – रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी दि. 28 मार्च रोजी झालेल्या छाननीअंती ३५ उमेदवार वैध ठरले आहेत. यात ३ राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांचे उमेदवार, १३ नोंदणीकृत राजकीय पक्षांचे उमेदवार आणि १९ अपक्ष असे एकूण ३५ उमेदवार वैध ठरले आहेत.

वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांमध्ये राजू पारवे (शिवसेना), श्यामकुमार बर्वे (इंडियन नॅशनल काँग्रेस), संदीप मेश्राम (बहुजन समाज पार्टी), आशिष सरोदे (भीमसेना), उमेश खडसे (राष्ट्र्र समर्पण पार्टी), मंजुषा गायकवाड (अखिल भारतीय परिवार पार्टी), गोवर्धन कुंभारे (वीरो के वीर इंडियन पार्टी) , प्रमोद खोब्रागडे (आंबेडकरराईट पार्टी ऑफ इंडिया), ॲड. भीमराव शेंडे (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), भोजराज सरोदे (जय विदर्भ पार्टी), रिध्देश्वर बेले (रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)), रोशनी गजभिये (गोंडवाना गणतंत्र पार्टी ), शंकर चहांदे (वंचित बहुजन आघाडी), सिध्दार्थ पाटील (पीपल्स पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटीक), संजय बोरकर (महा -राष्ट्र विकास आघाडी ), संविधान लोखंडे (बळीराजा पार्टी ), अजय चव्हाण (अपक्ष ), अरविंद तांडेकर (अपक्ष), ॲड. उल्हास दुपारे (अपक्ष), मा.कु.कार्तिक डोके (अपक्ष), किशोर गजभिये (अपक्ष), गोवर्धन सोमदेवे (अपक्ष), गौरव गायगवळी (अपक्ष), सौ.दर्शनी धवड (अपक्ष), नरेश बर्वे (अपक्ष) , प्रकाश कटारे (अपक्ष), प्रेमकुमार गजभारे (अपक्ष), सुरेश लारोकर (अपक्ष), डॉ.विनोद रंगारी (अपक्ष), विलास झोडापे (अपक्ष), सुनिल साळवे (अपक्ष), सुभाष लोखंडे (अपक्ष ), सुरेश साखरे (अपक्ष ), संदीप गायकवाड (अपक्ष), विलास खडसे (अपक्ष) यांचा समावेश आहे.

30 मार्च ही अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

 

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

पारडी येथील प्रस्तावित बाजारपेठेची मनपा आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर – नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२७ जून) पारडी …

मतदार यादीचा संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम 25 जून ते २४ जुलै या कालावधीत

बीएलओ करणार 25 जून ते २४ जुलै या कालावधीत घरोघरी भेटी देऊन मतदार यादीची तपासणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved