Breaking News

शाळा आणि पालक यांच्या समन्वयाने गावाचा चेहरामोहरा बदलवण्याची ताकद : रामदास कामडी

बरडघाट येथे वार्षिक स्नेहसंमेलन

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर:-शाळा ही गावाचा महत्वाचा घटक आहे.शाळेतून जे शिक्षण दिल्या जाते ते सर्वोत्तम असते. माणूस म्हणून जगण्यासाठी जे जे आवश्यक असते ते शाळेतून शिकवल्या जाते.त्यामुळे गावातील शाळा टिकल्या पाहिजे. शिक्षक सर्वोत्परी प्रयत्न करुन विद्यार्थ्यांचं जीवन घडवत असतात.सांस्कृतिक महोत्सव हा त्याचाच एक भाग आहे. यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो.त्यांच्यातील कलेला बहर येतो.शाळा आणि पालक यांचा समन्वय असला म्हणजे गावाचा चेहरामोहरा बदलायला वेळ लागत नाही असे प्रतिपादन चिमूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक रामदास कामडी यांनी केले. बरडघाट येथील जि. प. प्रा. शाळेत आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. उदघाटक म्हणून सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार श्रीहरी सातपुते उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून खडसंगी ग्रामपंचायत सरपंच प्रियंका कोलते,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष कवडू बारेकर, उपक्रमशील शिक्षक संजय सर, मुख्याध्यापक संतोष बारेकर, सुरेश सहारे, रामचंद्र सहारे, प्रमोद श्रीरामे, पंढरी श्रीरामे,रामभाऊ मेश्राम,डॉ. मंगेश घरत,हरिभाऊ रिनके, प्रभाकर दडमल,मनोज राऊत, आदी उपस्थित होते.

पाहुण्यांचे हस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी उदघाटक श्रीहरी सातपुते यांनी बरडघाट सारख्या लहान गावात शाळा, पालक आणि गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून तीन दिवसांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन अभिनंदनीय असल्याचे सांगत गावाच्या पर्यायाने देशाच्या विकासाचे राष्ट्रसंतांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी झटले पाहिजे,असे आवाहन केले.प्रमुख अतिथी संजय सर,संतोष बारेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुरेश डांगे यांनी केले.संचालन अर्चना डफ यांनी केले.

वार्षिक स्नेसंमेलनानिमित्त विद्यार्थ्यांच्या कलागुणांना भरारी मिळण्याकरिता विविध सांस्कृतिक, बौद्धिक, क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कार याप्रसंगी सादर केले. विद्यार्थ्यांसह पालक तथा ग्रामस्थानीही सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धात सहभाग नोंदवला. आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समिती, गुरुदेव सेवा मंडळ, महिला मंडळ तथा ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

सिडीसीसी बँकेच्या नोकर भरतीत मागासवर्गीयाचे आरक्षण डावलून कोट्यावधीचा भ्रष्टाचार

  jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती …

जिल्हा स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक

jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar   जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्हा स्कूल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved