अविनाश देशमुख शेवगांव
शेवगाव :- आबासाहेब काकडे माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाच्या वतीने आज शुक्रवार दि २५ एप्रिल रोजी यू.पी.एस.सी .परीक्षा उत्तीर्ण सौरव राजेंद्र ढाकणे यांचा गुणगौरव व सत्कार सोहळा संपन्न झाला. यावेळी ढोल ताशांच्या निनादात ढाकणे यांचे स्वागत करण्यात आले. सौरव राजेंद्र ढाकणे हे आबासाहेब काकडे माध्य. उच्च माध्य. विद्यालय शेवगावचे माजी विद्यार्थी असून त्यांनी UPSC परीक्षेत ६२८ वी रँक प्राप्त करत घवघवित यश संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला त्यानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता .
सदर कार्यक्रमाप्रसंगी आबासाहेब काकडे शिक्षण समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण बिटाळ,उपमुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीसिंह काकडे, सौरवचे वडील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख राजेंद्र कारभारी ढाकणे ,विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते , उपप्राचर्या रूपा खेडकर ,उपमुख्याध्यापिका पुष्पलता गरुड ,पर्यवेक्षक सुनिल आव्हाड , हरिश्चंद्र मडके , शिवाजी पोटभरे , प्रकाश दहिफळे सर ,सौरव ढाकणे यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक भालसिंग मॅडम,आदी मान्यवर उपस्थित होते .
सत्कारमूर्ती सौरव राजेंद्र ढाकणे आपले विचार व्यक्त करताना म्हणाले ,शाळेने केलेला सत्कार हा सर्वात जिव्हाळ्याचा सत्कार आहे. माझ्या यशात माझे पालक व माझ्या गुरुजनांचा सिंहाचा वाटा आहे. आज मुलांसाठी अनेक संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना चांगले मित्र असावेत, भरपूर कष्ट करा, अभ्यास करा, वर्तमानपत्र वाचा , त्याचबरोबर टेक्नॉलॉजीवर फोकस करा .सोशल मीडियाचा वापर कमी करा तसेच ध्येय ठरवा मेहनत करा. असे ते यावेळी बोलताना म्हणाले ,
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोविंद वाणी यांनी केले. आभार प्रा. सविता फाटके यांनी मानले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा .सौ. प्रतिमा उकिर्डे यांनी केले.
अविनाश देशमुख शेवगांव
सामाजिक कार्यकर्ता पत्रकार