jwalasamachar. jwalasamachar jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
jwalasamachar.jwalasamachar
* चिमूर पोलिसांनी कारवाई करीत १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त *
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर : – चिमूर शहरात अवैधरित्या मोठ्या प्रमाणावर रेतीची तस्करी जोमात सुरू असून रेती तस्करांवर कुणाचाही वचक नसून बिनधास्त पणे रेतीची माफिया द्वारे खुलेआम विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे तर अनेक रेती माफिया अवैधरित्या रेतीचा उपसा करून कुठे शेतात तर कुठे महामार्गाच्या कडेला रेतीचा साठा गोळा केला जात आहे. ट्रॅक्टरच्या कर्कश आवाजाने नागरिकांची रात्रीची झोप सुद्धा उडाली आहे.भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालवून अनेक नागरिकांचा तसेच चालक व मजुरांना जीव गमवावा लागला आहे. तर रात्री फिरायल्या जाणाऱ्या तसेच पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांना या रेतीच्या ट्रॅक्टर ची भीती दाटली आहे.असे असतांना देखील महसूल प्रशासन झोपी गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
तर आज दिनांक.१६/०६/२०२५ रोजी रात्रीला १२:३० ते १:०० वाजताच्या सुमारास अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ने भरधाव वेगाने राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई वर असलेल्या नेहरू चौक येथे गुजरात स्वीट मार्ट जवळील वळणावर वर ट्रॅक्टर वळण घेत असता रेतीने भरून असलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटी मारली तसेच रेती माफियांना पोलिसांची भीती वाटत असल्यामुळे त्यांनी त्याच वेळेस ट्रॉली तशीच ठेवून मुंडा घेऊन पसार झाले. याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस नेहरू चौक येथील गुजरात स्विट मार्ट या दुकाना समोर आले व पलटी मारलेली ट्रॅक्टर ट्रॉली बघितली यात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याचे चित्र बघितले ट्रॅक्टर ची ट्रॉली ही निळ्या रंगाची होती तर त्यात चोरीची रेती एक ब्रास भरून असल्याची आढळली.
ट्रॅक्टर (मुंडा) हा घटना स्थळावरुन पसार झाला असल्याची सुद्धा घटनास्थळी पोलिसांना माहिती मिळाली. व सदर ट्रॉली ही निळ्या रंगाची असून त्यावर MH-34 AP-0636 क्रमांकाची नोंद आहे.पोलीसांनी एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून भारतीय न्याय संहिता कलम 303 (2) BNS अंतर्गत अज्ञात ट्रॅक्टर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चालक मालक यांचा शोध पथक पोलिसांच्या माध्यमातून तपास सुरु असून ट्रॅक्टर मुंडा लवकरच पोलीस स्टेशनला जप्त करण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. तर पोलीस निरीक्षक संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निशांत फुलेकर, पो.ह.वा. चंपालाल राजपूत करीत आहे.