
शारीरिक व मानसिक निरोगीपन म्हणजे उत्तम आरोग्य -समतादूत प्रज्ञा राजूरवाडे
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-बार्टी व मूकनायक फाऊंडेशन तर्फे आरोग्य शिबीर संपन्न
आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी शरीर व मन दोन्ही व्यवस्थित असणे याला निरोगी आरोग्य म्हणतात चांगले आरोग्य राखणे हे आपल्याच हाथी असते चांगला आहार ,व्यायाम छंद जोपासणे मनोरंजनाचा आनंद घ्यावा व्यसनापासून दूर राहावे आंतरिक स्वच्छता राखावी मानसिक स्वास्थ्य चांगले राहिल्याने मनावर ताबा राहतो हिंशा राग भांडणे डिप्रेशन आत्महत्येचा विचार इत्यादी गोष्टीचा विचार मनात येत नाही,
आरोग्य धनसंपदा आहे आरोग्य हीच खरी संपत्ती आहे आरोग्य चांगले तर आनंदी जीवन जगू शकतात सर्वजण त्यातून आनंदी राहिल्याने आत्मविश्वास वाढतो सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन जीवन आनंदी जगता येते त्यासाठी सर्वांनी रक्तदान नेहमी करावे रक्तदानामुळे अपघाती रुग्णांना ज्यांच्या शरीरात रक्त कमी असते त्याना मदत होते ही खरी मानवता आहे किती वर्षे जगले हे महत्त्वाचे नाही पण आपण कोणाला तरी रक्तदान करून जीवनदान देत आहो हे महत्त्वाचे आहे रक्तदान अभियान हे सर्व गावागावात तरुणांनी राबवावे याला परोपकार म्हणतात म्हणून सर्व तरुणांनि रक्त दान प्रत्येक महिन्याला करायला हवे बुद्धांनी आरोग्यासाठी नेहमी म्हंटले आहे की मी चिकित्सक आहे,
आरोग्य देण्यासाठी आलो आरोग्य हा शब्द खूप मोठा आहे ज्यामध्ये व्यक्ती शारीरिक व मानसिक रित्या मुक्त होतो आरोग्य चांगले तर परिवार सुखी राहतो आनंदी राहतो तेव्हा ह्रदयविकार कॅन्सर शुगर बी पी रक्त हे नेहमी चेक करून घ्यावे मलेरिया डेंग्यू कोरोना यापासून स्वतःचे संरक्षण करावे व आनंदी जीवन जगावे अश्या ड्रा बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे च्या समतादूत प्रज्ञा राजूरवाडे यांनी खापरी धर्मु येथे आरोग्य शिबीर यांचे आयोजन मूकनायक फाऊंडेशन व बार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाणे घेन्यात आले,
तेव्हा या कार्यक्रमाच्या अद्यक्ष स्थानावरन आपल्या प्रमुख मार्गदर्शनात आरोग्य संदर्भात बोलत होत्या या कार्यक्रमाचे उद्घाटक तालुका वैद्यकीय अधिकारी ड्रा पटले चिमूर ड्रा बावनकुळे भिशी ऍड नितीन रामटेके पत्रकार मनोज डोंगरे ग्रामसेवक राजेश कांबळे सरपंच श्रेया शेंडे आकाश केमये ड्रा रंजना ड्रा रंदये ड्रा पांडे ड्रा चिमनकर नेवारे दडमल ग्रामपंचायत सदस्य आदि उपस्थित होते या वेळी गावातील सर्व नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात आली कार्यक्रमाचे संचालन मूकनायक फाऊंडेशन चे अद्यक्ष प्रकाश मेश्राम यांनी केले तर आभार प्रदीप रंदये यांनी केले