Breaking News

कराड येथे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या जाहीर मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विराट जनसमुदायाला संबोधित केले

प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

कराड: राज्यात युती सरकार अस्तित्वात आल्यानंतर शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत. सगळे निकष बाजूला सारून बळीराजाला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. अजूनही शासनाकडे पंचनामे येत असून त्यांनाही मदत करण्याचा आमचा प्रयत्न असेल असे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांनी याप्रसंगी बोलताना स्पष्ट केले.

कराड शहरातील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी तात्काळ निधी मंजूर केला, कराड शहरातील विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिली. विकासासाठी शिंदे सरकार ५० नव्हे तर १०० खोके द्यायलाही तयार आहे असे निक्षून सांगितले.

हे सरकार पडेल असे वारंवार सांगितले जाते, हिंमत असेल तर हे सरकार पाडून दाखवा असे जाहीर आव्हान यासमयी बोलताना दिले. हिंदुत्वाच्या विचारांशी सत्तेसाठी गद्दारी करणार नाही असेही यावेळी बोलताना स्पष्ट केले.

आजच्या या सभेत दलित पँथरचे अध्यक्ष सुखदेव सोनावणे यांनी आपल्या समर्थकांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष आणि कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सिंह यादव यांनीही आपल्या बारा नगरसेवकांच्या साथीने बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

याप्रसंगी राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार शहाजीबापू पाटील, आमदार महेश शिंदे, खंडाळ्याचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव, साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव, साताऱ्याचे युवासेना जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, उपजिल्हाप्रमुख अक्षय मोहिते, सातारा शहराचे शहरप्रमुख निलेश मोरे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच कराडकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

शेवगाव शहराच्या माणाचा तुरा खोवणाऱ्या तेजस प्रवीण मगर आणि किरण प्रवीण मगर बंधूंचा पटेल परिवार तर्फे शीरखुर्मा पार्टीमध्ये यथोचित सन्मान

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त शेती शेवगा शहरातील दोन सख्खे भाऊ नुकत्याच …

मतदानाचा सेल्फी, रिल्स्, पोस्टर्स, मिम्स् स्पर्धेचा निकाल जाहीर

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने घेतली होती स्पर्धा जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 25 : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved