
तालुका स्तरीय शालेय बँडमिंटन स्पर्धेत वाडी तील प्रगती विद्यालय विजय
प्रतिनिधी नागेश बोरकर दवलामेटी
दवलामेटी प्र:- नागपूर ग्रामीण तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धा हि , क्रिडा संकुल कळमेश्वर येथे दि. 17 नोव्हेंबर पासून घेण्यात आली. या स्पर्धेत नागपूर ग्रामीण तालुक्यातील १८ शाळेतील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या मध्ये 14,17,19 वयो गटातील मुला मुलींचा सामावेश होता. शकुंतला ताई देशमुख कनिष्ठ महाविद्यालय वाडी, सेंट व्हिसेंट पलोटी बेसा, माँर्डन स्कूल बोखारा, जवाहरलाल नेहरु विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाडी, ईटरनाँशनल स्कूल बोखारा या शाळेचा विद्यार्थ्यानी उत्कृष्ट खेळ सादर केला.
प्रगती विद्यालय व ग भां शकुंतला देशमुख उच्च माध्यमिक विद्यालय , आदर्श नगर वाडी येथील विद्यार्थ्यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी करून बँडमिंटन स्पर्धेत विजेते पद पटकावले व याचं विजयामुळे या चमुचे, विभागिय क्रीडा संकुल मानकापूर, नागपूर येथे 5 ते 6 डिसेंबर ला होणाऱ्या नागपूर जिल्हा बँडमिंटन स्पर्धेत निवड करण्यात आली. जिल्हा स्तरीय स्पर्धेत निवड झालेल्या चमू मध्ये शैलेश मेश्राम, ओजस गेडाम, अब्दुल कादीर चौहान, वेदांत जोशी, साहिल पाल हे खेळाडू आहेत.
याप्रसंगी तालुका क्रीडा संयोजक श्री उमेश चौरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाल्यामुळे विद्यार्थ्यांनी या यशाचे श्रेय पालक, मुख्याध्यापिका नंदिनी पोजगे, प्राथमिक मुख्याध्यापक
भाऊराव धाकरे, संस्था सचिव अतुल देशमुख , शारीरिक शिक्षक मंगेश ठाकरे, ज्युनिअर सह. शिक्षक सतीश शरणागत, पंकज बांते, ज्योस्त्ना झाडे यांना दिले.