
प्रतिनिधी जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
कल्याण:-आज डॉक्टर आश्विन पाटील यांचा फोन आला पेशंट खुप गरीब गरुजू आहे तरी तूम्ही येऊन स्वत भेट द्या कल्पतरू हॉस्पिटल कल्याण पश्चिमला पेशंट रमेश हटकर, उल्हासनगर यांना भेटून आपल्या शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीची मदत करता येईल का हे तपासणी साठी ?
मी जाऊन तत्काळ पेशंट यांना भेटून नातेवाईक यांचेशी चर्चा केली व पुढील उपचारासाठी मुंबई येथील केईम हॉस्पीटल येथे मदत करू असे आश्वासन शिवसेना वैद्यकिय मदत कक्षाच्या मध्यामतून मी डॉक्टर आश्विन पाटील व कैलास जाधव यांना देऊन रूग्णाच्या पुढील खर्चाचा व ईलाजाचा तपशिल देण्यास सांगितले.
मंगेश नरसिंह चिवटे, कक्ष प्रमुख – मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी, मंत्रालय, मुंबई यांच्या सहकार्याने अशी मदत महाराष्टातील जनतेला विविध ठिकाणी गरजवंत रूग्णांना त्यांच्या रूग्ण सेवकांमार्फत होत आहे तरी जनतेने जनजागृतीसाठी पुढाकार घेऊन हीच माहिती गरीब आणि गरजु रुग्ण व त्यांच्या कूटुंबा पर्यत पोहचवणे गरजेचे आहे.