Breaking News

चिमूर तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने बाईक रॅली ने भारत जोडो यात्रा

नफरत छोडो भारत जोडो बाईक रॅली

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चिमूर:-तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस यांचा संयुक्त विद्यमाने नफरत छोडो भारत जोडो यात्रा बाईक रॅली चिमूर येथुन महाराष्ट्र प्रदेश सेवादलचे महासचिव मा.प्रा.राम राऊत सर आणि माजी जि. प. अध्यक्ष तथा 74 चिमूर विधानसभेचे समन्वयक डॉ. सतिश वारजुकर यांच्या उपस्थित श्रीहरी बालाजी मंदिर पासुन सुरूवात करण्यात येत आहे. ही बाईक रॅली चिमूर ते कांपा पर्यंत आहे. कांपा येथे गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने जिल्हा अध्यक्ष मा. महेन्द्रा ब्राम्हणवाडे यांचा भव्य पैदल मोर्चा नागपुर विधानभवनावर जात असून या भव्य पैदल मोर्चाचे तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस यांचा संयुक्त विद्यमाने स्वागत करण्यात येत आहे.

या महागाईचा आणि बेरोजगार शेतकरी ,शेतमजूर, शेतकऱ्यांना प्रति एकरी सानुग्रह 25 हजार रुपये वार्षिक मदत देण्यात यावी ,20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू नये, पिक विमा धारकांच्या वैयक्तिक नुकसानीच्या तुलनेत नुकसान भरपाई देण्यात यावी. असे अनेक प्रश्न आहेत या करीता गडचिरोली ते नागपुर 175 की.मी. पैदल यात्रा दि. 14 डिसेंबर 2022 पासुन सुरूवात झालेली आहे. या यात्रेत शेतकरी, शेतमजूर,युवक,महिला , विद्यार्थी व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊया आणि काँग्रेस चे हात मजबूत करू या असे आव्हान तालुका काँग्रेसचे अध्यक्ष डॉ.विजय पाटील गावंडे यांनी केले आहे.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

इतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी – तात्काळ लोकसभा मतदारसंघ सोडावा

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर चंद्रपूर, दि. 17 : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील जे राजकीय पदाधिकारी, …

स्वत:च्या व देशाच्या उज्वल भविष्यासाठी निर्भिडपणे मतदान करा

जिल्हाधिका-यांचे मतदारांना पत्राद्वारे आवाहन जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर  चंद्रपूर, दि. 17 : प्रत्यक्ष मतदानाची वेळ अगदी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved