
विरोधी पक्षनेते यांनी घेतली निवेनाची दखल
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर:-चिमूर तालुक्यातील सरडपार गावाला शासनाने वाऱ्यावर सोडले असून या गावाला स्वतंत्र ग्राम पंचायत दर्जा मिळण्याचा मुद्दा विधानसभेत गाजणार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली निवेदनाची दखल चिमूर शहरापासून 10 किलोमीटर असलेल्या सरडपार या गावची गट ग्राम पंचायत काग ही होती परंतु चिमूरला नगर परीषदचा दर्जा मिळालामुळे नगर परिषदला काग व सोनेगाव ग्राम पंचायत मधील गावे समाविष्ट करण्यात आली सरडपार ग्राम पंचायतला काग, सोनेगाव व सरडपार असे तिन गांव सामील होते.
व या मधील काग व सोनेगाव हि दोन गाते चिमूर नगर परीषदेला सन 2015 म जोडण्यात आले, सरड़पार गाव 2015 ते आजपर्यंत कुठेही जोडल्या गेले नाही. त्यामुळे सरडपार् गाव शासनाच्या निधी पासून वंचित राहिले, या संदर्भात चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किर्तिकुमार भांगडिया. गट विकास अधिकारी चिमूर, तहसिलदार तहसील कार्यालय चिमूर, जिल्ला अधिकारी चंद्रपूर मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीष महाजन, यांना निवेदन देण्यात आले असून मेल द्वारे सुध्दा कळविण्यात आले तरी या गावची दखल 2015 पासुन कोणी घेतली नाही.
याचा त्रास सरडपार गाव वाशीयांना होत आहे. गावामध्ये शासनाच्या सुविधा गावा पर्यंत पोहचल्या नाही त्यामुळे गाव वाशीयांना 2015 पासून ग्राम पंचायत निवडणुकीपासुन वंचित ठेवण्यात आले होते. प्रशासनाने आता तरी अधिक लक्ष केंद्रीत करुन सरडपार गाव वाशीयांना हक्काचे ग्राम पंचायत कार्यालय दयावे अशी मागणी ग्रामवसियांच्या वतीने अमुल शेंडे यांनी निवेदनाद्वारे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांचे कडे करण्यात आली, अंबादास दानवे यांनी पत्राची दखल घेत हा प्रश्न अधिवेशनात मांडणार अशी भूमिका निवेदन कर्त्यांन जवळ मांडली.