Breaking News

पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून 112 उमेदवारांची प्राथमिक निवड

जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर

चंद्रपूर, दि.1 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रम्हपूरी यांच्या संयुक्त विद्यमाने 28 फेब्रुवारी रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ब्रम्हपूरी, येथे पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष मधुसूदन रुंगठा, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी आर.पी. मेहंदळे, नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गहाणे, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे आदी उपस्थित होते.

या मेळाव्यात इलेव्हेट रिअल इस्टेट चंद्रपूर, वैभव एंटरप्रायजेस नागपूर, परम स्किल ट्रेनिग इंडिया औरंगाबाद, जयदुर्गा ऑटोमोबाइल ब्रम्हपूरी, उषा कन्स्लटंसी नागपूर, नवकिसान बायोप्लॅणेटिक लिमीटेड, एलअॅंडटी कन्स्ट्रक्शन स्किल ट्रेनिग इस्टीटयुट पनवेल मुंबई, उत्कर्ष स्मॉल फायनांस बॅक नागपूर, आक्स फर्स्ट एचआर डेस्क चंद्रपूर , स्टॉप कॅन्सर मिशन नागपूर , विविआर फायंनेशिअल सर्विसेस, चंद्रपूर आदी कंपन्या मेळाव्यात सहभागी झाल्या होत्या. मेळाव्यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने एकुण 362 उमेदवारांनी नोंदणी केली. त्यापैकी 112 उमेदवारांची प्राथमिक निवड कंपनीमार्फत अप्रेंटिस ट्रेनी, मोटार मेकॅनिक मार्केटिग एक्झ्यिक्युटीव, टेलीकॉलर, असिस्टंट मॅनेजर अशा वेगवेगळया पदाकरीता प्राथमिक निवड करण्यात आली असून पूढील निवड प्रक्रिया कंपनीच्या स्तरावर करण्यात येणार असल्याचे कंपनीकडून कळविण्यात आले आहे.

तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. रुगंठा म्हणाले, चंद्रपूर जिल्हा ब्लॅक गोल्ड सिटी असून या जिल्हात कॉपर, गोल्ड, ग्रॅनाइट आदी खनीजे मुबलक प्रमाणात आहे. हा जिल्हा कृषी सधन असून सुजलाम, सुफलाम असल्याचे ते म्हणाले. श्री. मेंहेदळे यांनी उमेदवारांना एकत्रित येवून उद्योजक बनावे याबाबत मार्गदर्शन केले. तर सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन करून जास्तीत जास्त उमेदवारांनी मेळाव्याचा लाभ घेण्याचे तसेच आपल्या कौशल्याचा वापर रोजगार व स्वंयरोजगार मिळविण्यासाठी करावा, असे आवाहन केले. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वयक अमरिन पठाण यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांबद्दल माहिती दिली.

प्रास्ताविक मुकेश मुंजनकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन महात्मा गांधी नॅशनल फेलो अजय चंद्रपट्टन यांनी तर आभार सिद्धांत रामटेके यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे कर्मचारी,औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्रम्हपूरीचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

About Jwala Samachar

Chif Editor - Akshay Ramteke Mo. 9146988968 Email : jwalasamachar2019@gmail.com

Check Also

काँग्रेसला मोठा धक्का,या उमेदवारांच जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द

विशेष प्रतिनिधी-नागपूर नागपूर:-काँग्रेसला लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठा धक्का. रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांच जात …

पी बी उर्फ पुंजाराम भानुदास शिंदे यांनी पूर्ण केले नर्मदा परिक्रमा आणि श्रीक्षेत्र गाणगापूर पाई वारी

विशेष प्रतिनिधी-अविनाश देशमुख शेवगांव 9960051755 शेवगाव:-याबाबत सविस्तर वृत्त असे की शेवगाव शहरातील प्रसिद्ध व्यापारी आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

All Right Reserved