
जुन्नेर गावात विद्यार्थ्यांसाठी चिमण्यांचे घरटयांचे वाटप
प्रतिनिधी-जगदीश का. काशिकर
कायदा (लॉ) / सुरक्षा / गुंतवणुक सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
धुळे: अॅड. चैतन्य भंडारी यान्नी जुन्नेर येथील राऊळ खानोलकर निवासी मुकबधिर विद्यालय येथे विद्यार्थ्यांना चिमण्यांविषयी जनजागृतीसाठी चिमण्यांचे घरटयांचे वाटप केलेले आहे. कारण आता मोबाईल टॉवरच्या रेडिएशन मुळे दिवसेंदिवस चिमण्यांची संख्या कमी कमी होत आहे. त्याविषयी आता शहरी व ग्रामीण भागात जनजागृती होणे आवश्यक आहे. अॅड. चैतन्य भंडारी यांनी त्यांचे वडील धुळयातील नामवंत कायदेतज्ञ अॅड. मोहन एस. भंडारी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुन्नेर येथील राऊळ खानोलकर निवासी मुकबधिर विद्यालय येथे अॅड. भंडारी यांनी हा एक नविन प्रकारचा उपक्रम राबविला आहे.
सध्या वाढदिवस म्हटला म्हणजे सर्वांना आठवते ती पार्टी, डी.जे., केक ! परंतु या प्रथेला अॅड. भंडारी यांनी फाटा देत त्यांचे वडील अॅड. मोहन एस. भंडारी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना चिमण्यांचे घरटे वाटप करुन भावी पिढीला एक महत्वाचा संदेश दिला आहे तो म्हणजे चिमण्यांचे संगोपन करा, त्यांच्याविषयी आपुलकी बाळगा. आपण चिमण्यांविषयी आताच जर आपुलकी दाखविली नाही, त्यांना व्यवस्थित सांभाळले नाही तर भविष्यात चिमण्या नामशेष होतील. यावेळी अॅड. चैतन्य भंडारी यांनी सॉफ्ट बोर्ड, वजन काटे, सतरंजी व फळे इ. चे मुलांना वाटप केले.
याप्रसंगी जुन्नेर गावातील असंख्य नागरीक, जुन्नेर गावातील सरपंच, शाळेतील मुख्याध्यापक व कर्मचारी वर्ग तसेच अॅड. प्रशांत जोशी, अॅड. नाना टी. हालोर, रियाज सर, चार्मिश भंडारी, नितीन चौधरी यावेळी उपस्थित होते.