
दोन वर्षापासुन ओबीसी मुलींना शिष्यवृत्ती मिळालीच नाही
जिल्हा प्रतिनिधी-सुनिल हिंगणकर
चिमूर/चंद्रपूर:-राज्यातील मागासवर्गीय मुलींचे प्राथमिक व माध्यमिक शाळेतील गळतीचे प्रमाण रोखण्यासाठी ५वी ते ७वी व ८वी ते १० वीच्या मुलीकरिता’सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना’ सुरू करण्यात आली.ओबिसी मुलींना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व शैक्षणीक विकास व्हावा म्हणून ही योजना सुरू करण्यात आली.१५ जानेवारी २०१९ रोजी म़़त्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आणि सन २०१९-२०२० शैक्षणिक वर्षापासून लागू करण्यात आली.
पण दोन वर्षाचा कालावधी संपुन सुद्धा इतर मागासवर्गीय सावित्रींच्या लेकीच्या खात्यात पैसे जमा झाले नसल्याने पालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. ओबीसी पालकांनी बॅकेत जाऊन खाते काढण्यात आले. आवश्यक कागदपत्रे दरवर्षी मोठ्या जोमाने पालक देतात.खाते काढण्यासाठी बँकेत पैसे सूद्धा भरले पण दोन वर्षाचा कालावधी लोटुन सद्धा पैसै न झाल्याने ओबीसी मुलीवर अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया पालकांमध्ये उमटत आहे.सावित्रींच्या लेकीच्या खात्यात तात्काळ पैसे जमा करण्याची मागणी बहुजन कल्याण मंत्री ना.अतुल सावे यांचेकडे राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाचे अध्यक्ष कवडू लोहकरे यांनी केली आहे.
वर्ग ५-७ शिक्षण घेणाऱ्या मुलीकरिता दरमहा ६०/ रुपये याप्रमाणे १० महिण्याकरिता ६००/रुपये लाभ मिळतात.
वर्ग ८-१० मुलींकरिता दरमहा१००/रुपये १०महिण्याकरिता १०००/रुपये लाभ मिळतात.